नागपूरनंतर आता सोलापूरमध्येही बोगस मान्यतेचे धक्कादायक पडसाद…

सोलापूर :
राज्यातील नागपूर येथील शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय असतानाच, सोलापूर जिल्ह्यात देखील याच धर्तीवर मोठ्या घोटाळ्याचे धागेदोरे उघडकीस येत आहेत. शिक्षक भारती सोलापूर या शासनमान्य संघटनेने वारंवार निवेदनाद्वारे हे प्रकरण उपस्थित करूनही, माध्यमिक शिक्षण विभाग आणि पुणे येथील उपसंचालक कार्यालयाने आजतागायत कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असा आरोप संघटनेने केलेला आहे.
शिक्षक भारतीच्या माहितीनुसार, खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये बनावट व बोगस मान्यतांवर शिक्षकांची भरती करून त्यांना शालार्थ आयडी मिळवून देण्यात आले आहेत. यासाठी पूर्वीच्या काही शिक्षणाधिकाऱ्यांनी शासन निर्णय डावलून बोगस मान्यता दिल्याचे पुरावे संघटनेने वेळोवेळी सादर केले आहेत. सोलापूर माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेल्या तसेच बदली होऊन गेलेल्या काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या सेवाकाळानंतर अनेक बोगस मान्यता मोठ्या रकमा घेऊन दिलेल्या आहेत. अशा मान्यतांची नोंद व नस्ती माध्यमिक शिक्षण विभागात नसताना देखील त्यांच्या शालार्थच्या प्रस्तावावर माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी शिफारस करून पुणे उपसंचालक कार्यालयाकडे पाठवले आहेत. यामुळे बोगस मान्यता व शालार्थ बाबतीत सोलापूर मध्ये मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा शिक्षक भारतीने दावा केला आहे.
विशेष म्हणजे, काही लाभार्थ्यांनी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवताना चुकीची माहिती दिली असून, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आधीपासूनच शासकीय सेवेत असल्याचेही निदर्शनास आले आहे. खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये नोकरी मिळवताना काहीजण शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यातील ब्लॅकलिस्ट उमेदवार असताना मान्यता मिळवलेल्या आहेत.
शिक्षक भारतीच्या निवेदनाची दखल घेऊन शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून बोगस मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात चौकशीचे आदेश दिले गेले आहेत. परंतू शिक्षण उपसंचालक, पुणे यांच्या कार्यालयाने या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. बोगस मान्यता देणाऱ्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना नेमकं वाचवतंय कोण, याचा शोध घेणे आवश्यक आहे.
एवढेच नव्हे तर, शिक्षक भारतीच्या निवेदनांना दुर्लक्ष करून, ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचू न देण्याचा प्रयत्न माध्यमिक शिक्षण विभागात सुरू असल्याचे शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी सांगितले आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर, नागपूर येथील गाजत असलेल्या शिक्षक भरती व शालार्थ आयडी घोटाळ्याची पुनरावृत्ती सोलापूरमध्येही झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. याची तातडीने सखोल चौकशी करण्याची मागणी शिक्षक भारतीने निवेदनाद्वारे थेट मुख्यमंत्र्यांकडे यांच्याकडे मागणी केली आहे. नागपूर प्रमाणे सखोल चौकशी होऊन बोगस मान्यता देणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या हातात बेड्या पडणार का याकडे सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
*”शिक्षण व्यवस्थेतील प्रामाणिक शिक्षकांवर अन्याय होऊ नये, आणि गुणवत्ताधारक उमेदवारांना संधी मिळावी यासाठी शिक्षक भारतीचा संघर्ष सुरूच राहील. बोगस मान्यतांचे समर्थन कोणीही करू शकत नाही. या मान्यता देताना मोठा आर्थिक व्यवहार झालेला आहे. यासाठी संघटनेच्या निवेदनानुसार चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई व्हावी.”*
*सुजितकुमार काटमोरे* (जिल्हाध्यक्ष)
*शिक्षक भारती, सोलापूर*
या प्रसंगी शिक्षक भारती संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार गुंड, ती पन्ना कोळी, प्रा शाहू बाबर, भगवंत देवकर रमेश जाधव शरद पवार प्रकाश अतनुर,मायप्पा हाके,रियाजभाई अत्तार,समीर शेख,अजय चौखंडे, लक्ष्मीकांत खांडेकर योगेश टोणपे, राजकुमार देवकते उपस्थित होते
सोलापूर भाजपा शहर मध्य विधानसभेच्या मध्यपूर्व मंडल अध्यक्ष श्री.अक्षय अंजिखाने,मध्य-मध्य मंडल अध्यक्ष श्री.नागेश सरगम, मध्य पश्चिम मंडल अध्यक्ष श्री.नागेश खरात यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
शुभेच्छुक :- सोलापूर शहर मध्य विधानसभा पदाधिकारी व सदस्य