maharashtrapoliticalsocialsolapur

मतदानाचा संदेश घेत धावली सोलापूरकर तरुणाई…

क्रीडा भरती आणि सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे पावनखिंड दौड उत्साहात...

 

सोलापूर : प्रतिनिधी

‘मतदान आपले राष्ट्रीय कर्तव्य’,
‘मी करणार मतदान मी करून घेणार’ मतदान अशा घोषणा देऊन १०० टक्के मतदानाचा संदेश देत सोलापूरकर तरुणाई धावली. निमित्त होते शनिवारी क्रीडा भारती सोलापूर शहर व जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी आयोजित रन फॉर वोट पावनखिंड दौडचे.

महाराष्ट्र शासनाच्या पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य उमाकांत मिटकरी यांच्या हस्ते राजेंद्र चौकात झेंडा दाखवून पावनखिंड दौड चे उद्घाटन झाले. याप्रसंगी व्यासपीठावर क्रीडा भारतीचे प्रांत मंत्री ज्ञानेश्वर म्याकल, प्रांत सहमंत्री हरीश अनगोळकर, प्रांत प्रचार प्रमुख अनुजा दाभाडे, जिल्हा मंत्री राजेश कळमणकर, प्रबोधन मंचाचे जिल्हाप्रमुख विनायक बंकापूर, सोलापूर शहर व जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष एस. के. पवार, सी. ए. ऋषीकेश कुलकर्णी, व्यंकटेश केंची उपस्थित होते.

एकूण ५ किमी पावनखिंड दौडची सुरुवात राजेंद्र चौकात झाली. या दौडीत सहभागी सोलापूरकर तरुणाई आणि विद्यार्थ्यांनी पद्मशाली चौक, मौलाली चौक, सात रस्ता चौक, रंग भवन, हरिभाई देवकरण प्रशाला, सिद्धेश्वर प्रशाला, दत्त चौक, माणिक चौक, मधला मारुती चौक मार्गे राजेंद्र चौकात पूर्ण केली.

यावेळी विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनीही ‘संविधानाने दिलेला हक्क बजावणार मी करणार मतदान’,
‘जनमनाची जनमनाची पुकार आहे मतदान आमचा अधिकार आहे’,
‘मतदान आपले राष्ट्रीय कर्तव्य’,
‘शंभर टक्के देशहिताचे काम’,
‘मी घरी नाही बसणार मी महाराष्ट्र घडवणार’, ‘मी नागरिक सुजाण मी करणार मतदान’ अशी घोषवाक्ये असलेले फलक हाती धरले होते. या दौडीतील प्रत्येक गटातील प्रथम पाच विजेत्यांना पारितोषिकेही देण्यात आली.

याप्रसंगी सुधीर देव, दशरथ वडतीले, चन्नेश इंडी, प्रशांत कांबळे, अनिल पाटील, अश्विनी चव्हाण, गौरी आमडेकर, पद्मा तारके, ममता मुदगुंडी, श्रद्धा अध्यापक, कल्पना अर्शनपल्ली, उषा हंचाटे, वैजयंती कुलकर्णी, किशोरी भट, कीर्ती देशपांडे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button