ब्रेकिंग:– हिसका मारुन मोबाईल चोरणारी टोळी जेरबंद मोबाईल / लॅपटॉप चोरीचे ०५ गुन्हे उघड, गुन्हे शाखा, सोलापूर शहर यांची कामगिरी….
सोलापुर शहर गुन्हे शाखेकडील सपोनि/श्रीनाथ महाडिक व त्यांचे तपास पथक यांनी सोलापुर शहरातील मालाविषयी घडणारे गुन्हयाची माहिती काढत असताना, इसम नामे १) शंकर चंदुरसिंग मैनावाले, वय २५, रा. आडकी हॉस्पीटलच्या पाठीमागे, आर. के. स्टुडीओच्या बोळात, वेडर पुल, सोलापुर २) अजय मनोज जमादार, वय – २३. रा. जय भारत शाळेच्या पाठीमागे, बापुजी नगर, सोलापुर ३) महेश हनुमान मौलावाले, वय २३, रा. महात्मा फुले नगर, सिध्दार्थ चौक, कनक अपार्टमेंटच्या समोर, सोलापुर हे तिघे चोरीचे मोबाईल विक्री करण्याकरीता, पोटफाडी चौक ते सिद्धार्थ सोसायटी रोडवर येणार असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने, सापळा लावुन नमुद इसमांना, दि. १५/११/२०२४ रोजी ताब्यात घेतले. नमुद इसमांकडे चौकशी केली असत्ता, त्यांचे ताब्यातुन, एकुण १४ वेगवेगळे कंपनीचे मोबाईल, दोन लॅपटॉप, एक टॅब व गुन्हयात वापरत असलेली मोटार सायकल असा एकुण २,१३,१००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. नमुद इसमांकडुन सोलापुर शहरातील दोन मोबाईलचे जबरी चोरी सह एकुण ०५ मोबाईल लॅपटॉप चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
सदरची कामगीरी मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे पोलीस उप आयुक्त (गुन्हे/विशा), श्री. राजन माने मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/श्रीनाथ महाडिक, पोह/अंकुश भोसले, पोना/शैलेश बुगड, पोकों/राजकुमार वाघमारे, पोकों/अभिजीत धायगुडे, पोह/दत्तात्रय सुळ, पोकों/अजय गुंड, पोह/प्रकाश गायकवाड, पोह/मच्छींद्र राठोड, पोकों/वसिम शेख व चापोकों/सतिश काटे, चापोह/बाळु काळे यांनी केली ..