अवैध धंद्यांना उघडपणे परवानगी आणि शिवजयंती निमित्त नवीन मंडळांना प्रतिष्ठापनेसाठी पोलिस प्रशासनाने नकार दिल्याने राम जाधव शिव भक्तांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थाना बाहेर करणार आत्मदहन…
पालकमंत्री जयकुमार गोरे , स्थानिक आमदारांना शिवभक्त समक्ष भेटून देणार निवेदन...

सोलापूर
सोलापुरात अवैध धंद्यांना चांगलाच ऊत आला असून हे धंदे चालू ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन उघडपणे परवानगी देत आहे. अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवीन मंडळांना प्रतिष्ठापणे बाबत परवानगी मिळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे अर्ज सादर केला असता पोलीस प्रशासन त्याला परवानगी नाकारते. या विरोधात आपण आवाज उठवणार असल्याचं राम जाधव यांनी माध्यमांना सांगितल. याबाबत 14 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत . त्यावेळी आपण निवेदन देणार असल्याच जाधव म्हणाले. याबाबत स्थानिक आमदार विजयकुमार देशमुख, देवेंद्र कोठे , सुभाष देशमुख यांनाही निवेदन देण्यात येणार असल्याच राम जाधव यांनी सांगितलं.
या निवेदनात प्रामुख्याने लेझीम पथकास पार्क चौकातून परवानगी देण्यात यावी. तर डॉल्बीसाठी भैया चौकातून परवानगी देण्यात यावी. उच्च न्यायालयाने जे नियम व अटी घालून दिले आहेत त्या नियमात राहूनच डॉल्बीच्या मिरवणुका काढणार असल्याच राम जाधव म्हणाले.
मागण्या मान्य न झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती वर कडक निर्बंध करण्याचे प्रशासनाने ठरवले असेल तर सर्व शिवभक्तांना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील निवासस्थानाबाहेर आत्मदान करणार असल्याचा इशारा राम जाधव यांनी दिला..