अक्कलकोट रोड व होटगी रोड औद्योगिक वसाहत, पाकणी जलशुद्धीकरण केंद्रासंबंधीचे प्रश्न सोडविणार…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आ. देवेंद्र कोठे यांना ग्वाही...

सोलापूर :
अक्कलकोट रोड व होटगी रोड औद्योगिक वसाहतीमधील विविध सोयीसुविधांचा प्रश्न तसेच पाकणी येथील महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी जागेचा प्रश्न सोडवण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना मंगळवारी दिली.
आमदार देवेंद्र कोठे यांनी मंगळवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी आमदार देवेंद्र दादा कोठे यांनी सोलापूर शहर विकासाच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने अक्कलकोट रोड व होटगी रोड औद्योगिक वसाहतीमधील दर्जेदार अशा पायाभूत मूलभूत सुविधा पुरवणे, त्याचबरोबर पाकणी येथील जलशुद्धीकरण केंद्रासाठी वनविभागाची जागा मिळण्याचा विषय यांचा प्रामुख्याने समावेश होता. या सर्व विषयांबाबत लक्ष घालून लवकर तोडगा काढावा अशी विनंती आमदार देवेंद्र कोठे यांनी केली. यावर नेहमीप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व प्रश्न सोडवण्याची ग्वाही देतानाच सोलापूरच्या विकासासाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याचे अभिवचन दिले.
—-