maharashtrapoliticalsocialsolapur

श्री सिध्देश्वर महोत्सव-२०२५ स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न…

श्री सिध्देश्वर सोशल फाऊंडेशनचा उपक्रम...

 

प्रतिनिधी
सोलापूरातील श्री सिध्देश्वर सोशल फाऊंडेशनचा दरवर्षी प्रमाणे यंदाचा ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा व मकरसंक्रांत निमित्त आयोजित ‘ श्री सिध्देश्वर महोत्सव – २०२५ ‘ स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात रविवारी सायंकाळी रंगभवन येथील समाज कल्याण केंद्र येथे संपन्न झाला.
या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून
श्री सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे यावेळी बोलत असतांना म्हणाले, गेल्या दहा वर्षापासुन श्री सिद्धेश्वर फौंडेशनच्या माध्यमातून मुलांसाठी बाराबंदी पोशाख स्पर्धा, महिलांसाठी विविध फोटो स्पर्धा,या शतकोत्तरांची परंपरा असलेल्या पुण्यनगरी सोलापूरातील श्री सिद्धेश्वर यात्रेच्या दरम्यान होत असतात वास्तविक पाहता या गोष्टी ऐकायला, वाचायला खूप सोप्या वाटत असतात परंतु या स्पर्धा करणाऱ्यालाही अवघड आहे तसेच परीक्षकांसाठी अवघड ठरतात महिलांनी इरकल साडीला फॅशन आहे म्हणून परिधान न करता आपली संस्कृती म्हणून जपण्याचे आवाहन श्री सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे यांनी यावेळी बोलतांना केले.

प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले रयतक्रांती संघटनेचे अध्यक्ष नामदेव पवार पारितोषिक वितरणावेळी बोलताना म्हणाले, आज समाजात शैक्षणिक, सामाजिक, औद्यौगिक तसेच इतर कोणत्याही स्पर्धा असु दे त्यात महिलांचा सहभाग हा पुरुषांपेक्षा जास्तच असल्याचे दिसून येत आहे व ही समाधानकारक बाब असून यामुळे घरातील मुलांना योग्य प्रकारे संस्कार देत प्रत्येक क्षेत्रात मुलांना महिला या प्रोत्साहन देतात.

एखादी महिला ही स्पर्धेत उतरलेली असते ती तेव्हाच खऱ्या अर्थाने जिंकलेली असते कारण स्पर्धेत उतरणे हे ही महत्वाचे असल्याचे मत यावेळी स्पर्धेतील विजेत्या सौ नीता गवळी यांनी व्यक्त केले व श्री सिध्देश्वर सोशल फाऊंडेशनसह अध्यक्ष आनंद मुस्तारे, सचिव विकास कस्तुरे यांचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन… यांनी केले.
यावेळी सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे, रयतक्रांती संघटनेचे अध्यक्ष नामदेव पवार, शिवसेनेच्या सौ.प्रिया बसवंती, श्री सिध्देश्वर सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष आनंद मुस्तारे, सचिव विकास कस्तुरे,शशिकांत बिराजदार, महेश पुरवंत,डॉ.सौ.कोडमुर,रीलस्टार तेजश्री बिराजदार आदी उपस्थित होते.

बक्षिस विजेते

बाराबंदी वेशभुषा बालगोपाल गट

पहिला – कु.दर्श धनंजय बंडे
दुसरा – कु.आरुष किशोर बुगडे
तिसरा – कु. साईश अभिजीत कल्याणकर
चौथा – कु. विरेश रेवणसिद्ध कोळकुर
पाचवा – प्रियांश प्रशांत हेले

उत्तेजनार्थ

कु. वीर अमोल तांदळे
कु. अशर्व राहुल आमणे
कु. सक्षम महांतेश कोरे
कु. ईशाण रोहित बडवणे
कु. शौर्य सागर दिक्षीत

महिला फोटो स्पर्धा

पहिला – सौ. शैलजा पुरवंत
दुसरा – सौ.स्नेहा कुरणे
तिसरा – सौ. ऐश्वर्या हब्बु
चौथा – सौ. विजयश्री गुळवे
पाचवा – सौ. श्रद्धा यलगम

महिला रिल्स स्पर्धा

पहिला – सौ.कांचन बेडगे
दुसरा – सौ. राजेश्वरी बसवंती
तिसरा – सौ. रुपाली कोरे
चौथा – सौ.नीता गवळी
पाचवा – सौ. सुजाता रघोजी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button