वैभव गंगणे यांच्या निवेदनाची पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः घेतली दखल पोलीस आयुक्तालयात पार पडली शहर पोलिस दलातील अधिकारी , जडवाहतूक असोसिएशन संघटना , वाहन मालक , बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर यांची संयुक्तिक बैठक…
पोलीस आयुक्तांनी बैठकीत दिले हे आदेश चला तर जाणून घेऊ...!

सोलापूर
सोलापुरात अपघातांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे . सोलापूरकरांना आपला जीव मुठीत धरून बाहेर पडावे लागतय. जडवाहतूक सोलापूरकरांच्या जीवावर बेतली आहे . जड वाहतुकीमुळे अनेकांचे कुटुंब उध्वस्त होतात. या महत्त्वाच्या विषयावर आवाज उठवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे शहर – जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे यांनी पालकमंत्री यांना शहरातून जडवाहतुक हद्दपार करा .
पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन देताना वैभव गंगणे
हे निवेदन दिले होते. या निवेदनाची पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः दखल घेऊन पोलिसांना सूचना केल्या होत्या. त्यानंतर सोमवारी पोलीस आयुक्त कार्यालयात आयुक्तांनी शहर पोलिस दलातील अधिकारी , जडवाहतूक असोसिएशन संघटना , वाहन मालक , बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर यांची संयुक्तिक बैठक घेतली. व या बैठकीत आयुक्तांनी कोणते आदेश दिले ?यावर खालील प्रमाणे नजर टाकू…
१. वाहन मालक यांनी त्यांचे वाहनावर चालक म्हणून हुशार व ज्याला जड वाहन चालविण्याचा ५ वर्षांचा अनुभव आहे असा चालकाची नियुक्ती करण्यात यावी.
२. शहरातील रस्त्यावर वाहनांचा वेग २० kmph पेक्षा जास्त असू नये..
३. प्रत्येक वाहनामध्ये डॅशबोर्ड कॅमेरा बसविण्यात यावा.
४. प्रत्येक वाहन मालकाने आपल्या वाहनाच्या पाठीमागील दर्शनी भागात मोठ्या अक्षरात त्यांचा मोबाईल नंबर टाकावा, जेणेकरून चालक रैश ड्राइविंग करत असल्यास मालकाला संपर्क करता येईल.
५. वाहन चालकांनी वेग मर्यादा ओलांडू नये.
६. प्रत्येक वाहन चालकचा व मालकाचा मोबाईल नंबर, ड्राइविंग लायसन्स, आधारकार्ड यांची प्रत वाहतूक शाखेकडे जमा करावे.
७. विशेषत: चालक हा दारू पिऊन वाहन चालवणार नाही याबाबत मालकानी खात्री करावी.
८. वाहन चालक याचा कडून एखादा अपघात घडल्यास वाहन मालकाचीही त्यामध्ये जबाबदारी निश्चित करण्यात येईल.
बैठकीत दिलेल्या आदेशाचे सर्वांनी पालन करावे. योग्य ती खबरदारी घ्यावी. नियम बाह्य जड वाहतुकीवर कारवाई करण्यात येईल . कायद्याच्या चौकटीत राहून वाहतूक करावी असे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले. या बैठकीस पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा अजित बोराडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉ. विजय कबाडे , पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ.दिपाली काळे व शहर पोलीस दलातील प्रमुख अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…