maharashtrapoliticalsocialsolapur

ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांची पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथे सपत्नीक सदिच्छा भेट

पोलीस मुख्यालयातील रोप वाटीका व बायोगॅस सयंत्र प्रकल्पांचे उद्घाटन

 

सोलापूर

आज दिनांक 15/11/2025 रोजी भारतातील *परम सुपरकॉम्प्युटरचे जनक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. श्री. विजय भटकर सपत्नीक सोलापूर दौज्यावर होते*. त्यांनी *पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीचे औचित्य साधून अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथे नव्याने निर्माण करण्यात आलेल्या रोपवाटीका व बायोगॅस सयंत्र प्रकल्पांचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांचे हस्ते करण्यात आले आहे.

 

 

पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या रोपवाटीकेत 150 पेक्षा जास्त विविध प्रकारच्या प्राणवायू निर्माण करणाज्या व औषधी वनस्पतींच्या रोपांचे संकलन करण्यात आले आहे. या उद्घाटन प्रसंगी डॉ. श्री. विजय भटकर यांनी पर्यावरण समतोल राहण्यासाठी झाडांचे महत्व सांगून मोठया प्रमाणात झाडांची लागवड करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तसेच श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी वृक्षसंवर्धनामध्ये हरीतवारी या उपक्रमांतर्गत लावण्यात आलेल्या दीडलाख वृक्ष लागवड कार्याची प्रशंसा देखील केली.

 

 

तसेच पोलीस मुख्यालय येथे बायोगॅस सयंत्र संच बसविण्यात आला असून त्या संचात कचज्यापासून स्वयंपाकासाठी आवश्यक असणारा गॅस तयार होणार आहे. या गॅसवर पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथील उपहारगृहात तयार होणारे अन्नपदार्थाकरीता त्याचा वापर करण्यात येणार आहे. बायोगॅस सयंत्रामध्ये गॅस तयार होण्यासाठी झाडांची पडलेली पाने, कचरा इत्यादी चा उपयोग करण्यात येणार आहे. या दोन्ही पर्यावरण पुरक प्रकल्पाचे उद्घाटन  डॉ. विजय भटकर यांचे हस्ते सपत्नीक करण्यात आले आहे

 

 

सदर कार्यक्रमावेळी सोलापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक मा.श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक (गृह) मा. श्री. शिरीष हुंबे, पोलीस कल्याण शाखेचे निरीक्षक श्री. बाजीराव पोवार, राखीव पोलीस निरीक्षक श्री. कांबळे, इतर मान्यवर व पोलीस मुख्यालयाकडील पोलीस अंमलदार उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button