प्रतिष्ठीत व्यक्तीच्या सुनेचा विनयभंग करणा-या आरोपीस ३ वर्षे सश्रम करावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली:- जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत…

सोलापूर
सदर प्रकरणात सविस्तर हकीकत अशी की, दि. 26/08/2025 रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास पिडीत महिला ही घरातील सर्व कामे संपवून स्वयंपाक घरात जेवण घेत असताना तिच्या घरातील आरोपी नोकर राजू हणमंतु भंडारे हा गेट बंद करण्याच्या बहाण्यानी स्वयंपाक घरात आला आणि सदर पिडीत महिलेचा विनयभंग केला तद्भतर पिडित महिलेने सदर आरोपीस जाब विचारला असता आरोपीने चुकुन हात लागल्याचे सांगितले तदनंतर आरोपी पुन्हा स्वयंपाक घराच्या पाठीमागील गेटच्या कुलुप लावून स्वयंपाक घरात आला आणि त्यानी पिडित महिलेस एकेरी भाषेत बोलून अश्लील व लज्जास्पद भाषेमध्ो पिडित महिलेजवळ येवून पिडित महिलेस शारिरिक सुखाची मागणी केली व पुन्हा तिचा विनयभंग केला त्यामुळे पिडित महिलेने डॉक्टरकडे उपचार घेऊन सदर घटनेची फिर्याद सदरबझार पोलिस स्टेशन येथे दिली. त्याप्रमाणे पोलिसांनी सदर आरोपी विरु-द भारतीय न्याय संहिता चे कलम 74,75 (2), 79
प्रमाणे गुन्हा नोंदवला आणि तपासाअंती मा. न्यायालयामध्ये दोषारोपत्र दाखल केले होते. सदर प्रकरणात सरकारपक्षातर्फ एक कूण ६ साक्षीदार तपासण्यात आले आणि सरकार पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला की सदर पिडीत महिला ही एका प्रतिष्ठीत घराण्यातील प्रतिष्ठीत व्यक्तीची सून आहे तर सदर आरोपी हा सदर पिडित महिलेच्या घरातील विश्वासू नौकर आहे असे असतानासुद्धा सदर नोकराने पिडित महिला व तिच्या घरातील सदस्यांचा विश्वासघात करुन सदर महिलेचा विनयभंग केला आहे सदर प्रकरणात पिडित महिला तिची सासू आणि शेजारी व्यक्तींनी घडलेल्या घटनेप्रमाणे सुसंगत अशी न्यायालयामध्ये साक्ष दिली असून त्याप्रमाणे सरकारपक्षाने आरोपी विरुद्धचा विनयभंगाचा अपराध न्यायालयामध्ये सिद्ध केलेला आहे त्यामुळे आरोपीस जास्सीतजास्सु शिक्षा देण्यात यावी असा युक्तीवाद केला असता, सोलापूरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती रेड्डी मॅडम यांनी भारतीय न्याय संहिताचे कलम 74 प्रमाणे दोषी धरुन सदर आरोपीस ३ वर्षे सश्रम कारावास आणि १०००/- रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना करावास, तसेच कलम 75 प्रमाणे २ वर्षे सश्रम करावास आणि 1000/- रुपये दंड, दंड न भरलयास १ महिना करावास आणि 1000/- रुपये दंड, दंड न भरलयास १ महिना साध्या करावासाची शिक्षा ठोठावली आहे.
सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सराकरी वकील अॅड. डॉ. प्रदिपसिंग राजपूत यांनी काम पाहिले तर आरोपीच्यावतीने अॅड. महेश सोलनकर यांनी काम पाहिले.



