crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

घातक शस्त्रासह शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या शहर गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या…

आरोपींकडून 10 लाख 29 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत....

सोलापूर

 

 

दिनांक २०/०९/२०२६ रोजी रात्रीच्या सुमारास सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत चंदनशिव व त्यांच्या तपस पथकातील पोलिस अंमलदार असे मिळून एम. आय. डी. सी पोलिस ठाणे हद्दीमध्ये मालाविषयक गुन्हे उघड करणे व गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारार्फत सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव व त्यांच्या तपास पथकातील पोलिस शिपाई अमोल यादव यांना बातमी मिळाली की, काही इसम हे सोलापूर शहरात दरोडा घालण्याच्या तयारीत असून ते सध्या प्लॉट नंबर ८३ अमर ज्योती नगर , नरसिंग नगरच्या शेजारी , मुळेगाव रोड सोलापूर येथे जमा झाले आहेत . तसेच त्यांच्याकडे घातक शस्त्रे, एक कळ्या रंगाची चारचाकी वाहन , एक मोटार सायकल असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली .त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव यांनी यांनी सदरचा बातमीचा आशय गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांना फोनद्वारे कळवला.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी ही बातमी सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांना कळविली.

 

 

 

त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने हे स्वतः त्यांच्या सोबत गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव, सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश सोनवणे, पोलिस उप निरीक्षक विजय बनसुडे, मनोज मोरे व त्यांच्या तपास पथकातील अंमलदार या टीमने घटनास्थळी धाव घेतली.
या ठिकाणी पाहणी केली असता, बातमीतील आशयाप्रमाणे एक काळया रंगाचे चारचाकी वाहन व एक मोटार सायकल दिसून आली. तसेच या चारचाकी वाहनाजवळ ७ इसम संशयास्पद स्थितीत बोलत थांबल्याचे निदर्शनास पडले.संबंधित इसम हे दरोडा सारख्या गंभीर गुन्हा करणार असल्याचा दाट संशय आल्याने तात्काळ पोलिस पथकाने सापळा रचून दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या इसमाना ताब्यात घेतलं.

 

 

 

 

.त्याच्याकडे अधिक चौकशी नंतर मंडीपसिंग दयासिंग संधू वय ४३ वर्षे , रा. गुरुद्वारा लंगर साहिब, नमिना घाट नांदेड, बलप्रीतसिंग सतनामसिंग खैरा वय २५ वर्षे रा खैरा निवास बडपुरा गुरुद्वार गेट नंबर ४ भगतसिंग रोड नांदेड, अंकुर राजकुमार प्रतापसिंह वय २८ वर्षे राहणार तारवा पोस्ट अरप जिल्हा घटना राज्य – बिहार , लक्ष्मण नामदेव जगताप वय ३५ वर्ष रा. म्हसोबा मंदिर जवळ जगताप वस्ती भागगाव संभाजीनगर , सुखदेवसिंग बलविंदरसिंग गिल वय ४२ वर्षे राहणार वैरोवाल ,तहसील खडूर साहेब जिल्हा तरनतारण राज्य – पंजाब ,दिलीपसिंग हरिसिंग पवार खालसा वय ३४ वर्षे राहणार ब्रम्हसिंग नगर पो. तरोडा { बु} नांदेड, राजेश कन्निराम राठोड वय ४४ वर्षे राहणार नरसिंह नगर मुळेगाव रोड सोलापूर अशी माहिती तपासा दरम्यान समोर आली.

तसेच त्यांच्या ताब्यामध्ये महिंद्रा XUV 500 वाहन क्रमांक MH 12 HB 7700 व यामाहा कंपनीची मोटार सायकल क्रमांक TG 07 AJ 6467 मिळून आली.

अटकेत असलेल्या सर्व आरोपींची अंगझडती घेतली असता त्यामध्ये अंकुर राजकुमार प्रतापसिंह याच्या कब्जातील 1 देशी बनावटीचे पिस्तूल व 5 जिवंत राऊंड मिळून आले.तसेच या इसमाच्या ताब्यामध्ये महिंद्रा XUV 500 वाहन क्रमांक MH 12 HB 7700 व यामाहा कंपनीची मोटार सायकल क्रमांक TG 07 AJ 6467 या वाहनांची पंचाच्या समक्ष तपासणी केली असता , महिंद्रा XUV 500 या वाहनामध्ये 2 तलवार , 3 खंजीर , 2 कटावणी,1 छन्नी, एक लांब दोरखंड , 3 जोडी हँडग्लोज, दोन नंबर प्लेट, कलर स्प्रे बॉटल , 7 मोबाईल असा मुद्देमाल मिळून आला.या वस्तुबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता प्रथम त्यांनी उडवा – उडवीची व असमाधान कारक उत्तरे दिली. त्यांना अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यापैकी राजेश कन्निराम राठोड याने सांगितले की , शहर हद्दीमध्ये पहाटे दरम्यान दरोडा टाकून लुटमार करणार होतो .अशी कबुली दिली.

या आरोपींवर गुन्ह्याच्या कबुली नंतर एम आय डी सी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 310 { 4} सह भारतीय हत्यार कायदा कलम 3/25,4/25 सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 मधील कलम 37(1) ,(2) ,135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपींना अटक करण्यात आली.

या आरोपींवर पूर्वी खून , खुनाचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी, जबरी चोरी , हत्यार कायदा यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहेत .

ही दमदार कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार, शहर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त डॉ.अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने,सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव, निलेश सोनवणे,पोलिस उप निरीक्षक विजय बनसुडे, मनोज मोरे व त्यांच्या पथकातील पोलिस अंमलदार अंकुश भोसले , नंदराम गायकवाड, जाविद जमादार, ,विजय वाळके, तात्यासाहेब पाटील , वाजीद पटेल, बापू साठे , योगेश बर्डे, आबाजी सावळे, धीरज सातपुते, अमोल यादव , विठ्ठल यमगर, गणेश शिंदे , अभिजित पवार , शंकर याळगी, सुभाष मुंढे, सैपन सय्यद , वसीम शेख, युवराज गायकवाड, भारत पाटील, विशाल कुलकर्णी, सायबर पोलिस ठाण्याकडील मच्छिंद्र राठोड व वाहन चालक श्याम सुरवसे, परबत, राजशेखर पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडली…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button