india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन अ‍ॅम्फी थिएटरमध्ये दिवसभर विविध कार्यक्रम होणार शंभराव्या साहित्य संमेलनाची महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेकडून नांदी

सोलापूर,(प्रतिनिधी)ः-

 

100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जानेवारी 2027 मध्ये होणार असून त्याबाबतची संपूर्ण महाराष्ट्रात जागृती आणि प्रसार होण्यासाठी महाराष्ट्रातील विविध शहर जिल्ह्यासह देश विदेशात महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, समर्थ युवा फौडेंशन, महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नांदी साहित्य संमेलन होणार आहेत त्याचाच भाग म्हणून सोलापूर मध्ये 5 वे नांदी साहित्य संमेलन शनिवार दि. 26 सप्टेंबर 2026 रोजी लोमान्य टिळक सभागृह अ‍ॅम्फी थिएटर सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. वामसी लॅब यांच्या सहकार्याने सोलापूर मध्ये नांदी संमेलन होणार आहे. अशी माहिती समन्वयक जितेश कुलकर्णी आणि यशवंत बिराजदार यांनी दिली.

 

 

सोलापूर मध्ये होत असलेल्या 5 वे नांदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक रविंद्र गुर्जर असणार आहेत. तर स्वागताध्यक्ष वामसी लॅबचे मदना केशव रेड्डी आहेत. भाषा अनुबंध या शिर्षकाखाली होत असलेले 5 वे नांदी साहित्य संमेलनाचे उदघाटन शनिवार दि. 26 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष सिने अभिनेते योगेश सोमण यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी समर्थ युवा फौउेंशनचे राजेश पांडे आणि वामसी लॅबचे मदना केशव रेड्डी यांच्यासमवेत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उदघाटनानंतर सकाळी 11 वाजता निमंत्रित बहुभाषिक काव्य संमेलन त्यानंतर दुपारी 12.30 वाजता युवा कवी संमेलन त्यानंतर दुपारी 3 वाजता वेणुगोपाल संगीतालय यांचा सूर काही राहिले हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता समारोप आणि त्यानंतर सायंकाळी 7 वाजता लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा शिवरायांचा छावा हा कार्यक्रम होऊन नांदी साहित्य संमेलनाची सांगता होणार आहे. पद्मश्री मारूती चित्तमपल्ली यांच्या नावाचे प्रवेशद्वार या नांदी साहित्य संमेलनात उभारण्यात आले असून सर्व कार्यक्रम कवी संजीव व्यासपीठावर होणार आहेत.

 

 

 

सोलापूर मध्ये होत असलेल्या या नांदी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या सोलापूरमधील, सोलापूर, जुळे सोलापूर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, पश्‍चिम सोलापूर, मोहोळ या शाखांच्यावर असूनप्रा.डॉ.श्रृतीश्री वडगबाळकर,किशोर चंडक, प्रा.नरेंद्र काटीकर,पद्माकर कुलकर्णी, सायली जोशी, गिरीश दुनाखे,रेणुका महागांवकर, प्रशांत बडवे, जितेश कुलकर्णी, शिवजी शिंदे, उज्वला साळुंखे, संतोष साळुंखे, श्रीकांत मोरे, अस्मिता गायकवाड, राजशेखर शिंदे, डॉ.स्मिता प्रमोद पाटील, सुधीर नाईकनवरे, जयेश आराध्ये हे सर्व पदाधिकारी आहेत तर संयोन समिती मध्ये गोविंद काळे, डॉ. रामचंद्र धर्मसाले, डॉ. नितीन आवताडे, वंदना कुलकर्णी, शोभा बोल्ली, अश्‍विनी चव्हाण, अविनाश कामतकर, भिमगोंडा पाटील, बदीउज्जमा बिराजदार, दत्तात्रय पाटील, प्रमोद कोरे, अनिल देवसाले, प्रसिध्दीप्रमुख विनायक होटकर हे काम पाहणार आहेत. या नांदी साहित्य संमेलनाला सोलापूरकरांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button