मनीषा फुले { इतर मागास बहुजन कल्याण }सहाय्यक संचालक यांच्या भ्रष्ट कारभाराची अजित दादांकडे कोणी केली तक्रार पहाच?…
सोमवार पासून राजाभाऊ बेळेनवरु मनीषा फुले यांच्या विरोधात करणार आमरण उपोषण...

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक मनीष फुले यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये २०१४-१५ दरम्यान मोठ्या प्रमाणात घोटाळा उघडकीस येऊन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. मनीषा फुले सोलापूर मध्ये सहाय्यक संचालक म्हणून दिनांक २७-१०-२०२३ रोजी झाल्यापासून सोलापूर मध्ये त्यांचा मनमानी कारभार त्यांच्या विभागाचे संबंधित अधिकारी व काही मुख्याध्यापक यांना हाताशी धरून सुरू केला होता.या भर याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाने आवाज उठवत सोमवारी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. मनीषा फुले यांच्या खातेनिहाय भ्रष्ट कामकाजाची व गैर मार्गाने कमविलेल्या मालमत्तेची आजतागायत सखोल चौकशी होवून व मनीषा फुले यांच्या बडतर्फाची कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ बेळेनवरु यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,जिल्हाधिकारी ,पोलीस आयुक्त,प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण { प्रादेशिक विभाग पुणे} यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे…