आमदार देवेंद्र कोठे यांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
सोलापूर
माझी महापौर आणि आमदार देवेंद्र कोठे यांचे काका महेश कोठे यांचे प्रयागराज येथील कुंभमेळ्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर तेथून पार्थिव सोलापूरला आणण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी वैयक्तिक लक्ष घालून महेश कोठे यांचे पार्थिव प्रयागराज वरून लखनऊ आणि लखनऊ वरून सोलापूरला आणण्यासाठी संपूर्ण यंत्रणेला आदेश दिले. त्यामुळे महेश कोठे यांचे पार्थिव सोलापूरला आणण्यासाठी मोठी मदत झाली. तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही या कामी मोठे सहकार्य केले. महेश कोठे यांचे पार्थिव सोलापुरात आणल्यानंतर सोलापूर विमानतळापासून अंत्यविधी होईपर्यंत सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे आणि संपूर्ण पोलीस यंत्रणेने सहकार्य केल्याची प्रतिक्रिया आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली.