यात्रेच्या अनुषंगाने मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी उत्तर कसबा येथील हब्बु वाड्यात घेतली महत्वाची पत्रकार परिषद ….
धार्मिक विधिंबाबत दिली सविस्तर माहिती ...

सालाबाद प्रमाणे याही वर्षी सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांची यात्रा उत्साहात संपन्न होणार आहे .याबाबत माहिती देण्यासाठी मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी उत्तर कसबा येथील हब्बुवाड्यात महत्वाची पत्रकार परिषद बोलावली होती.
या यात्रे दरम्यान कुंभार प्रमुख मानकरी योगीराज शिवलिंग
म्हैत्रे – कुंभार हे दरवर्षी आपती सेवा बजावतात. या यात्रेला दिनांक 10/01/2025 पासून प्रारंभ होणार आहे .सकाळी ठीक ८ वा.मल्लिकार्जुन म्हैत्रे – कुंभार यांच्या निवासस्थानी{ उत्तर कसबा कुंभार वाडा सोलापूर } येथे प्रथम श्री गणेशाची व श्री सिद्धरामेश्वर यांच्या मूर्तीचे पूजन करून दिवे घालण्याचा कार्यक्रम होईल .त्यानंतर पूर्वापार चालत आलेल्या परंपरे नुसार ५६ नग मातीचे घागरी यात्रेचे प्रमुख मानकरी हिरेहब्बू यांच्याकडे सुपूर्द करण्याचा कार्यक्रम योगीराज कुंभार यांच्याकडून केला जाईल .
दिनांक 12/01/2025 रविवार रोजी सकाळी 7.30 वा. तेलाचे घागरीचे विधीवत पूजन मानकरी श्री. योगीराज कुंभार यांचे हस्ते करून सदर घागर मानकरी श्री. योगीनाथ शिवशेट्टी यांचेकडे 68 लिंगांना तेलाभिषेक करण्यासाठी सुपूर्द करण्यात येईल.
3) दिनांक 13/01/2025 सोमवार रोजी सकाळी 7.30 वा. मानकरी श्री. मल्लिकार्जुन कुंभार म्हेत्रे यांचे निवासस्थानी श्री गणपती व श्री सिध्दरामेश्वरांचे प्रतिमेचे पूजन करून पंचामृताने धागरीचे पूजन केले जाईल. त्यानंतर नंदीध्वज मिरवणूक उत्तर कसब्यातीत कुंभार वाड्यासमोर आल्यानंतर मानाच्या पहिल्या नंदीध्वजास खोबरे लिंबूचे हार आणि बाशिंग बांधून नंदीध्वजांचे, श्रींच्या पालखीचे विधीवत पूजन केले जाईल.
त्यानंतर सिद्धेश्वर मंदिराजवळील संमती कट्टयाजवळ नंदीध्वजाचे आगमन झाल्यानंतर मानकरी योगीराज म्हेत्रे-कुंभार यांच्या हस्ते सुगडी दिल्यानंतर श्री.हिरेहब्बू व श्री. देशमुख यांचे हस्ते सुगडीपूजन केले जाते. त्यानंतर मानकरी श्री. योगीराज शिवलिंग म्हेत्रे-कुंभार यांना मानाचा विडा दिला जातो. त्यानंतर परंपरेप्रमाणे अक्षता सोहळा संपन्न होईल.
4) दि. 14/01/2025 मंगळवार रोजी सकाळी 7.30 वा. होमकट्ट्यावरील लिंगाची विधीवत पूजा मानकरी कुंभार यांचेकडून केली जाईल.
संध्याकाळी नंदीध्वजांचे होम मैदानावर आगमन झाल्यानंतर मानकरी श्री. योगीराज शिवलिंग म्हेत्रे-कुंभार यांचेकडून 5 बाजरीचे पेंड्यांना श्री. योगीराज कुंभार व श्री. मल्लिकार्जुन कुंभार यांच्याकडून कुंभार कन्या माता कुमारव्वा देवीचे प्रतिकात्मक रूप तयार केले जाते. सदर कुंभार कन्या माता कुमारव्वा देवीस श्री सिध्देश्वर देवस्थानकडून मणी, मंगळसूत्र व साडी दिली जाते. त्यानंतर कुंभारकन्येचा प्रतिकात्मक रूपास श्री. हिरेहब्बू यांच्या हस्ते विधीवत पूजा करून मानकरी श्री. योगीराज म्हेत्रे-कुंभार यांना श्री. हिरेहब्बू यांच्याकडून मानाचा विडा दिला जातो. त्यानंतर पूर्वापार परंपरेप्रमाणे होमविधीचा कार्यक्रम संपन्न होतो.
यात्रेच्या काळात समस्त कुंभार परिवाराच्या घरांमध्ये पाच दिवसांचे दिवे घालून पाच दिवसांचा उपवास केला जातो. अशी ही माहिती मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेत यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू,सुधीर थोबडे , तम्मा मसरे यांच्यासह यात्रेतील मानकरी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती…
यात्रे दरम्यान कोणीही सेवन करू नये असे आवाहन मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी पत्रकार परिषद केले आहे…