india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

शहर मध्य विधानसभेची सदस्य नोंदणी अभियान कार्यशाळा आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकारात संपन्न…

 

भाजपा प्रदेश महामंत्री आमदार.विक्रांत पाटील यांनी साधला दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद : आमदार देवेंद्र कोठे यांचे प्रमुख मार्गदर्शन

सोलापूर :

भारतीय जनता पार्टी शहर मध्य विधानसभेची सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळा बुधवारी श्रीकृष्ण मंगल कार्यालयात उत्साहात झाली. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार देवेंद्र कोठे,भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश निमंत्रित सदस्य शहाजी पवार, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, सरचिटणीस रोहिणी तडवळकर, विशाल गायकवाड, माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू, भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा विजया वड्डेपल्ली, भाजपचे शहर उपाध्यक्ष भूपती कमटम उपस्थित होते.

कार्यशाळेचे उद्घाटन भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज, पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले.

या कार्यशाळेला भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील म्हणाले,भाजपा सदस्यता नोंदणी अभियानांतर्गत पुढील चार दिवसांमध्ये प्रत्येक मंडलात बैठक व कार्यशाळा घेऊन प्रत्येक बूथवर किमान २०० सदस्यांची नोंदणी करावी. ५ जानेवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विशेष अभियान राबवत भाजपा सदस्य नोंदणी आयोजित करावी. सोलापूर शहर मध्य विधानसभेतून ५० हजार सदस्य नोंदणी पूर्ण करणे अपेक्षित आहे, असेही श्री. पाटील याप्रसंगी म्हणाले. यावेळी त्यांनी सदस्यता नोंदणी अभियानाबाबत आवश्यक सूचना दिल्या.

आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, आपल्या जवळच्या भागातील घराघरांमध्ये,शाळा महाविद्यालय परिसर, विडी कारखाने, प्रमुख व्यापार पेठ, औद्योगिक वसाहती व विधानसभा क्षेत्रातील प्रमुख चौकाचौकात जाऊन प्रवास करत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपा सदस्यता नोंदणी करावी. आपल्या भाजपा परिवाराची विचारधारा जनमानसात रुजली पाहिजे, या दृष्टीने प्रयत्न करावेत. आपल्या जवळच्या भागातील घरोघरी भेट देत लोकांचे प्रश्न, समस्या आणि भावना समजून घ्यावेत. सोलापूर शहर मध्य विधानसभेतून ५० हजार सदस्य नोंदणी पूर्ण करण्याचा विश्वासही आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

भाजपा शहर अध्यक्ष नरेंद्र काळे,सरचिटणीस रोहिणीताई तडवळकर, शहाजी भाऊ पवार, विशाल गायकवाड यांनी कार्यशाळेस मार्गदर्शन केले तर शहर चिटणीस नागेश सरगम यांनी सूत्रसंचालन केले.

या कार्यशाळेस भाजपाचे नगरसेवक, नगरसेविका, लोकप्रतिनिधी, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, प्रदेश विशेष निमंत्रित, प्रदेश आघाडी मोर्चा कार्यकारणी, जिल्हा, मंडल कार्यकारणी, जिल्हा, मंडल आघाडी, मोर्चा, प्रकोष्ठ कार्यकारणी, शक्ति केंद्रप्रमुख, बुथप्रमुख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


————
चौकट

कार्यकर्त्यांनी आमदारांसोबत घेतला स्नेहभोजनाचा आस्वाद

आमदार देवेंद्र कोठे यांच्यातर्फे यावेळी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी भाजपाच्या विजयाबद्दल स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा सदस्य नोंदणी अभियान कार्यशाळेनंतर भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या समवेत स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button