Fast news :- बनावट/नकली सोने खरे असल्याचे भासवून, फसवणूकीचा प्रयत्न करणाऱ्या ०४ पर-प्रांतीय आरोपीना शहर गुन्हे शाखेकडून अटक….

दिनांक ३१/१२/२०२४ रोजी गुन्हे शाखेकडील स.पो.नि./विजय पाटील व त्यांचे तपास पथकास गोपनीय बातमी मिळाली की, एका महिलेस अन्नपुर्णा स्वीट, पद्मानगर, सोलापुर येथे येऊन, काही पर-प्रांतीय आरोपी हे नकली सोने विक्री करणार आहे. त्याअनुषंगाने, स.पो.नि./ विजय पाटील व त्यांचे तपास पथकाने सापळा रचुन, आरोपी नामे (१) आण्णाराम बाबुजी सोलंकी, वय-२३ वर्ष, रा. मुद्रासिली, ता. भिनमाल, जि. जलोर, राज्य-राजस्थान, (२) करण सेलाराम परमार, वय-१९ वर्ष, रा. ओढा, ता. शिवगंज, जि. शिरोई, राज्य-राजस्थान (३) दरगाराम प्रागाराम, वय-३९ वर्ष, रा.२३२ बेरा पिपलिया, रामसिन, ता. भिनमाल, जि. जलोर, राज्य-राजस्थान व (४) लखाराम सुनाजी दाबी, वय-५५ वर्ष, रा. भागल, ता. मिनमाल, जि. जलोर, राज्य-राजस्थान है, सोन्या सारखा दिसणारा नकली हार विक्री करुन, एका महिलेची फसवणुक करण्याच्या प्रयत्नात असताना, त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यावेळी, त्यांचेकडुन नमुद नकली सोन्यासारखा दिसणारा ०१ किलो ७०० ग्रॅम वजनाचा हार, तसेच गुन्हयात वापरलेला मोबाईल फोन व ०२ मोटार सायकल असा १,०४,०००/- रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत केला. याबाबत, एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गुरनं. ९०७/२०२४, भा.न्या.सं.क.३१८ (४),६२,३ (५) अन्वये गुन्हा दाखल करणेत आला आहे.
(ब) तसेच, स.पो.नि./ विजय पाटील व त्यांचे तपास पथक यांनी आरोपी नामे-१) जगन्नाथ मल्लिनाथ कोळी, रा. होटगी, सोलापुर, २) हणमंतु राजु चौगुले, रा. मडडी वस्ती, सोलापुर, ३) शितल किसनसिंग शिवशिगवाले, रा.लोधी गल्ली, सोलापुर, ४) विवेक गोविंदराज बेत, एम.आय.डी.सी. सोलापुर व ५) प्रसाद नारायण देवगण, रा. मंगळवार पेठ, सोलापुर यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडून एकूणच ०२,०६,०००/-रू . किं.मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या पथकाने तपास पथकाने, फसवणुकीचा प्रयत्न-०१ आणि चोरीचे ०४ गुन्हे असे एकुण ०५ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
ही कामगिरी, मा. श्री. एम.राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे/वि.शा., श्री. राजन माने, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली, स.पो.नि./ विजय पाटील व पोलीस अंमलदार राहुल तोगे, आबाजी सावळे, अजिंक्य माने, धिरज सातपुते, विठ्ठल यलमार, चालक सतीश काटे, काळे व सायबर पोलीस ठाणेकडील मच्छिद्र राठोड व प्रकाश गायकवाड यांनी केली आहे….
पोलीस प्रशासनाच्या वतीने सोलापूरकरांना अशा पद्धतीने कोणी जर घरोघरी येवून कमी किमतीमध्ये सोने विकत असेल तर नागरिकांनी ते घेवू नये व त्वरित Dil 112 किंवा पोस्टेशनला माहिती द्यावी. त्यामुळे अश्या गुन्ह्यांना आळा बसेल व गुन्हेगारांवर वेळेतच कारवाई केली जाईल…