बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध शाळा ,महाविद्यालयांमध्ये CCTV कॅमेरे बसविण्याबाबत व दामिनी पथक भरोसा सेल च्या माध्यमातून समाज प्रबोधना बाबत राष्ट्रवादी महिला आघाडीचे पोलीस आयुक्तांना निवेदन…
बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित नराधमाला फाशी देण्यात यावी- संगीता जोगधनकर{महिला आघाडी अध्यक्ष}

सोलापूर
राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष तथा राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपालीताई चाकणकर सोलापूर निरीक्षक दिपाली पांढरे जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांवरील सातत्याने होणाऱ्या अन्याय विरोधात कारवाई करण्यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीने पोलीस आयुक्तालय येथे आयुक्त एम राजकुमार यांना निवेदन देण्यात आले. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित नराधमाला फाशी देण्यात यावी. अशा घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन यांनी स्थानिक पातळीवर वैयक्तिक लक्ष ठेवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या निवेदनामध्ये प्रमुख मागण्या प्रत्येक चौका- चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे दामिनी पथक बीट मार्शल आणि भरोसा सेल च्या माध्यमातून परिसंवाद आयोजित करणे आणि त्याच अनुषंगाने चर्चासत्र भरवणे टोल फ्री नंबर ची माहिती सर्व कॉलेज शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देणे व समाज प्रबोधन करणे आदी मागण्यांवर भर टाकण्यात आला होता. या निवेदनाची पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी लवकरच दखल घेऊ असं आश्वासन दिल.
सदर निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्ष संगीता जोगधनकर, युवती अध्यक्ष किरण माशाळकर,सुरेखा घाडगे प्राजक्ता बागल प्रियंका कांबळे यांची उपस्थिती होती…