educationalmaharashtrapoliticalsocialsolapur

प्राचार्य मधुकर पवार यांचा सेवानिवृत्त निमित्त सत्कार….

 

सोलापूर

दिनांक:- येथील छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजचे प्रभारी प्राचार्य मधुकर पवार हे आपल्या 33 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्याबद्दल त्यांचा मराठा समाज सेवा मंडळ च्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे व उच्च शिक्षण विभाग सोलापूर शिक्षण सहसंचालक डॉ उमेश काकडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार, डॉ प्राचार्य शिवाजीराव देशमुख,भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्रकल्प संचालक संजय कदम, मुख्याध्यापक महामंडळाचे राज्याचे अध्यक्ष तानाजी माने, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

यावेळी सपाटे यांनी प्राचार्य डॉ पवार यांना आपल्या एक वर्षाच्या कार्यकाळात संस्थेचे नाव वाढवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. तर शिक्षण सहसंचालक डॉ काकडे म्हणाले की प्राचार्य पवार यांनी महाविद्यालयातील एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून काम केले.

 

 

प्राचार्य डॉ पवार यांच्या पत्नी संजीवनी पवार, तसेच राज्य महामार्ग प्राधिकीकरणाचे संजय कदम, प्राचार्य डॉ अरुण मित्रगोत्री, सुरेश जगदाळे डॉ निकिता पवार, दत्ता भोसले आदींनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या

 

या कार्यक्रमास विनायकराव पाटील, ज्ञानेश्वर सपाटे,महादेव गवळी, अशोक चव्हाण, शिवदास चटके, रेखा सपाटे,सुनिता साळुंखे,मंजुश्री पाटील,उषा गोखळे,महानंदा सोलापुरे, मोहम्मद शेख, यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका महामुनी यांनी केले तर आभार प्रा.महेश माने यांनी मांडले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa