ब्रेकिंग:- शॉट सर्किट मुळे लागली आग नविपेठेतील दोन दुकाने जळून खाक….
आगीत २५ ते ३० लाखांचा मुद्देमाल जळून खाक...

सोलापूर
नविपेठेत शुक्रवारी मध्यरात्री च्या सुमारास विद्युत विभागाच्या हलगर्जीपणा मुळे शॉट सर्किट होऊन दोन दुकानांना भीषण आग लागली. या दोन्ही दुकानाच्या लगत विद्युत विभागाचा DP आहे. हा DP अतिशय धोकादायक स्थितीत असल्याने व्यापाऱ्यांनी वारंवार तक्रारी करून देखील विद्युत विभागाचे कर्मचारी य या कडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी व्यापाऱ्यांनी केल्या. या हलगर्जी पणा मुळेच ही घटना घडल्याचे व्यापाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाल्याने व तात्काळ या घटनेची माहिती अग्निशामक दलाला कळवण्यात आल्याने आणि वेळेचे प्रसंगावधान राखून अग्निशामक दलाच्या जवानांनी लागलेली भीषण आग आटोक्यात आणल्याने पुढचा मोठा अनर्थ टळला .
या आगीत मनोहर दासरी व जय विजय पवार व्यापाऱ्यांची दुकाने जळून राख झाली आहेत. या आगीत जवळपास दासरी व पवार यांचे २६ ते ३० लाखांचे नुकसान झाल्याचे घटनेच्या तपासात निष्पन्न झाले. या घटनेबद्दल सोलापूरकरांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय….