crimemaharashtrapoliticalsocialsolapur

Speed News:-अवैध गॅस धंद्यावर सदर बझार पोलीस ठाणे व अन्नधान्य वितरण विभागाची अचानक धाड…

कारवाईत १३ गॅस सिलेंडर व अवैध धंद्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य हस्तगत...

सोलापूर

अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे,पोलीस आयुक्त एम राजकुमार,यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त डॉ.विजय कबाडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १८/१२/२०२४ रोजी अवैध गॅस धंद्यावर सदर बझार पोलीस ठाणे व अन्नधान्य वितरण विभागाची संयुक्तिक कारवाई करण्यात आली.

 

 

घरगुती गॅसचा वापर अवैध गॅस धंद्यासाठी वापर करताना रेल्वे कॉलनी परिसरात टाकण्यात आलेल्या धाडीत १३ गॅस सिलेंडर च्या टाक्या ,२ पंप , ३ वजन काटे हस्तगत करण्यात आल्या.

 

ही कारवाई परिमंडळ अधिकारी प्रफुल्ल नाईक ,श्रीनिवास वाघ, अनिल गवळी नंदकिशोर ढोके, पुरवठा निरीक्षक राजेश यमपुरे, सज्जन भोसले , ज्ञानेश्र्वर काशीद , सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलीस हवालदार शहाजान मुलाणी, लक्ष्मीकांत फुटाणे यांनी यशस्वी पणे पार पाडली….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button