सोलापुरातील हा डॉक्टर सापडला लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ….
छावाचे योगेश पवार यांचेमार्फत तक्रारदाराने केली होती एसीबीकडे तक्रार...

सोलापूर –
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतील रक्त तपासणीचे बिल काढण्यासाठी आणि चौकशी अहवाल सकारात्मक पाठविण्यासाठी जिल्हा समन्वयक डॉक्टर माधव जोशी यांनी डॉक्टर पटणे यांचे मॅनेजर प्रकाश कैलास हांडगे यांना दोन लाखांची लाच मागणी केली.
त्यामुळे छावाचे योगेश पवार यांनी प्रकाश हांडगे यांचेमार्फत डॉक्टर माधव जोशी यांचे स्टिंग ऑपरेशन केले होते. व त्यानंतर योगेश पवार यांचेमार्फत तक्रारदाराने ACB कडे तक्रार केली. ACB चे DYSP गणेश कुंभार यांनी पंचा समक्ष मागणीची पडताळणी केली अन् त्यानंतर तकारदाराकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारत असताना डॉ. माधव जोशी यांना पंचा समक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ACB कडून चालू आहे.
ताजा_कलम – छावाचे योगेश पवार यांनी डिसेंबर 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये कमीत-कमी 09 ते जास्तीत_जास्त 27 लाचखोर लोकसेवकांना एसीबीच्या ट्रॅपमध्ये अडकाविन्यासाठीची लिस्ट व संबंधित तक्रारदार व पुरावे गोळा करून ठेवले आहेत. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सर्वसामान्य जनतेला त्रास देणारे व कामाची अडवणूक करून लाच घेणाऱ्या 27 लोकसेवकांच्या यादीतील पहिली विकेट आज घेतली. बाकी 26 मधलेही लवकरच सापडतील….