crimemaharashtrapoliticalsocialsolapur

Superfast:- प्रभाकर महाराज चौक येथे परिवहन महामंळाच्या बसेसवर केलेल्या दगडफेक घटने प्रकरणी एका आरोपीस अटक तर दुसरा फरार…

अटकेतील आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी...

सोलापूर

यात थोडक्यात हकीकत अशी की यातील फिर्यादी कैलास आनंदराव हेंडगे वय 38 वर्षे व्यवसाय एस. टी.चालक रा. गौळ तालुका कंदार जिल्हा नांदेड हे परिवहन मंडळाची बस वाहन क्रमांक MH 14 BT 4952 ही स्वतः चालवत होते . प्रभाकर महाराज चौक सोलापूर येथून ही बस जात असताना तीन अज्ञात अनोळखी व्यक्तींनी बसवर दगडफेक केली.यात बसचे प्रचंड नुकसान झाले.या घटनेतील साक्षीदार नाव बालाजी दत्तात्रय गंगणे हे परिवहन मंडळाची चालवीत असलेली बस वाहन क्रमांक MH 05 EM 1382 या वाहनावर ही त्या तीन अज्ञात अनोळखी व्यक्तींनी दगडफेक केली .यामध्ये शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्या कारणाने त्या तीन अज्ञात व्यक्तीं विरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर 719/2024 प्रमाणे भारतीय न्याय संहिता कलम 324(3),(3)5, व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा कलम (3)1प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी या घटनेचा जलदगतीने तपास करून यात जितेश शरण बसप्पा महिंद्रकर वय ३२ वर्षे रा.रमाबाई आंबेडकर नगर न्यू बुधवार पेठ सोलापूर याला बुधवारी अटक केली .तर त्याचा दुसरा साथीदार मोहसिन मैंदर्गिकर सध्या फरार असून त्याचाही शोध पोलिसांकडून सुत्रा मार्फत घेण्यात येतोय त्याला लवकर अटक करण्यात येईल असे पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.या प्रकरणात आरोपींवर दाखल करण्यात आलेल्या कलमांमध्ये पोलिसांनी वाढ केली आहे.अटकेतील आरोपीस पोलिसांनी सोलापूर जिल्ह्या न्यायालयात हजर केले असता में.न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी ची शिक्षा सुनावली आहे.या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडागळे करीत आहेत…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button