शिवसेना राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ ज्योतीताई वाघमारे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 16 मधील मोदी येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ…

सोलापूर
((प्रतिनिधी ()
मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून, प्रा.डॉ.ज्योतीताई वाघमारे यांच्या प्रयत्नातून मोदी पाच कंदील ते उपलप यांच्या घरापर्यंत डांबरी रस्ता करणे ह्या कामाचे भूमिपूजन शिवसेनेच्या र राज्यप्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे यांच्या हस्ते कुदळ मारून सुरू केले. यामुळे या भागातील नागरिकांचा पावसाळ्यात रस्ता खराब असल्यामुळे होणारा त्रास कमी होणार आहे
अशी माहिती युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे यांनी दिली.
हा रस्ता खराब असल्यामुळे हा रस्ता दुरुस्त करून देण्याची गेल्या मागील पंधरा वर्षांपासून येथील नागरिकांची मागणी होती, ह्या रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे येथील नागरिकांमध्ये समाधान वातावरण आहे , येथील नागरिकांनी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व शिवसेना राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ.ज्योतीताई वाघमारे व युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे यांचे आभार मानले.
प्रभाग क्रं.16 मध्ये तीन कोटी चा निधी मंजूर मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्योतीताई वाघमारे यांच्या शिफारशीने मंजूर करून आणला.
यावेळी शिवसेना राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती ताई वाघमारे, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे,मा. नगरसेवक नागनाथ वाघमारे,भाजपा नेते संतोष कदम, सुरेश माडे, श्री बाबुराव संगेपाग, जाधव विशाल कल्याणी, भीमा वाघमारे,दीपक पाटील, सचिन गुंतूनल, भैया भोसले, स्वप्निल कांबळे,अविनाश बेंजर्पे. यावेळी या भागातील महिला नागरिकांची लक्षणीय गर्दी होती.