crimemaharashtrapoliticalsocialsolapur

मनगोळी ता.द.सोलापूर व नंदूर ता.उत्तर सोलापूर येथे महा ई.सेवा केंद्र मिळण्यासाठी व त्याचा लाभ घेण्यासाठी बनावट कागदपत्र तयार करून शासनास सादर करून शासनाची फसवणूक करण्याऱ्यावर तात्कळ गुन्हे दाखल करा:- गणेश मोरे…

सोलापूर

सागर काशिनाथ कुलकर्णी व सोमनाथ काशिनाथ कुलकर्णी दोघे राहणार हत्तूर ता.द.सोलापूर येथील रहिवाशी आहेत, यांचा हत्तूर येथे श्री मल्टीस्टेट सर्व्हिस या नावाने ऑनलाईन सेवेचा व्यवसाय आहे , सदरील सागर काशीनाथ कुलकर्णी व सोमनाथ काशीनाथ कुलकर्णी या दोघांनी मिळून मनगोळी ता.द.सोलापूर व नंदूर ता.उत्तर सोलापूर येथे महसुल विभागाकडून महा ई.सेवा केंद्र मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला आहे, त्यासाठी त्यांनी लागणारी सर्व कागदपत्रे आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड , रहिवाशी दाखला, भाडे करार पत्र, यासह स्थानिक रहिवाशी दाखला, ग्रामपंचायतीची शिफारस यासह अनेक कागदपत्र बोगस व बनावट तयार करून शासनास सादर केली आहेत, महा.ई.सेवा केंद्राचा लाभ घेण्यासाठी हे दोघे अपात्र आहेत, हे स्थानिक रहिवाशी नाहीत, व यांना मनगोळी व नंदूर ग्रामपंचायतीने कोणतीच शिफारस दिली नाही, नियमावलीत स्थानिक लोकांना प्राधान्य असल्याचा नियम आहे, यांनी शासनास सादर केलेली सर्व कागदपत्र ही बनावट व बोगस आहेत, तरी आपण तात्काळ यांच्या कागदपत्राची तपासणी करून सत्यता तपासून व स्थानिक लोकांची चौकशी करून कुलकर्णी यांनी सादर केलेली सर्व कागदपत्र जप्त करून शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याबाबत सागर काशिनाथ कुलकर्णी व सोमनाथ काशिनाथ कुलकर्णी या दोघांवर IPC SECTION- 465 BNS – 336(2), IPC 471- BNS- 340(2), IPC 467- BNS -338 व IPC 420- BNS -318(4) प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करून हत्तूर येथील श्री मल्टीस्टेट सर्व्हिस या महा.ई.सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्यात यावा अशी तक्रार गणेश मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button