india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

मालकांच्या विजयात पत्रा तालीम मंडळाचे आधारस्तंभ श्रीकांत घाडगे यांचा सिंहाचा वाटा… मा.नगरसेवक डॉ.किरण देशमुख

श्रीकांत घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभ सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लावली लक्षणीय उपस्थिती...

सोलापूर

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांचा सलग पाचव्यांदा प्रचंड मताधिक्याने विजय झाला.

 

पत्रा तालीम परिसरातून “मालकांवर” मतदानाचा वर्षाव झाला .या विजयासाठी मुख्य भूमिका बजावणारे पत्रा तालीम मंडळाचे आधारस्तंभ श्रीकांत “आण्णा” घाडगे यांनी व त्यांच्या इतर समर्थकांनी विशेष परिश्रम घेतले आणि पत्रा तालमीत विजयाचा झेंडा फडकवला .

 

शुक्रवारी श्रीकांत आण्णा घाडगे यांचा वाढदिवस होता .त्या निमित्त श्रीकांत आण्णा घाडगे यांना प्रत्यक्ष भेटून,फोनवरून ,सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव केला.

यावेळी श्रीकांत आण्णा घाडगे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ ,भारतीय जनता पार्टीचा विजय असो, आमदार विजयकुमार देशमुख मालकांचा विजय असो अश्या घोषणांनी पत्रा तालीम परिसर दणाणून सोडला होता .

विधानसभा नंतर सर्वांनाच उत्सुकता आहे ती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची . यंदाच्या या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत श्रीकांत आण्णा घाडगे यांना भाजपा कडून निश्चितच उमेदवारी दिली जाऊ शकते . आमदार विजयकुमार देशमुख श्रीकांत घाडगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.

 

श्रीकांत आण्णा घाडगे यावेळी नक्कीच नगरसेवक होतील असा विश्वास येथील स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जातोय.माजी नगरसेवक डॉ.किरण देशमुख यांनी आण्णाना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना यंदाच्या या विधानसभा निवडणुकीत आपला सिंहाचा वाटा असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीवेळी ही आण्णाचाच गुलाल उधळला जाईल असे प्रतिपादन केले आहे.

व्यासपीठावरील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीकांत घाडगे यांनी केक कापला .यावेळी एकच जल्लोष करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर खलिफा पैलवान दत्तात्रय कोलारकर , शिवाजी घाडगे गुरुजी , राजाराम दुधाळ , नागनाथ बन्ने, महेश गादेकर ,नाना काळे,पुरुषोत्तम बरडे,संतोष पवार,

बापू धंगेकर , मनोज गादेकर ,माजी नगरसेवक डॉ. किरण देशमुख,प्रशांत पाटील , उद्योजक प्रकाश ढवळे , अमर दुधाळ,
बाळासाहेब गायकवाड ,प्रा. श्रीनिवास कोंडी सर,
बाळासाहेब पुणेकर , प्रशांत बडवे, विशाल गायकवाड , सतीश कुदळे ,प्रमोद भोसले,अमीर शेख,सोमनाथ शिंदे,

श्रीकांत डांगे,शिवाजी वाघमोडे ,पैलवान सुरज बंडगर,दशरथ कसबे, तामलावडीचे उपसरपंच सुधीर पाटील ,जयजित गादेकर , बापू जाधव ,महेश बोकन, अजय यादव , गणेश नरोटे,GM मागासवर्गीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू गायकवाड , नागेश खरात , बाळासाहेब बिडकर , दद्दू भोसले,शुभम धुळराव, सनी धुळराव ,ज्ञानेश्वर बनसोडे,शेखर फंड ,दीपक पेठकर ,आकाश कामाठी ,यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

सत्कार सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुहास कोलारकर , वैभव गंगणे ,नवनाथ कोलारकर ,आनंद कोलारकर , पवन पाटील, आदित्य घाडगे ,सुरज भोसले ,मोहन माळी ओम घाडगे , मयुरेश घाडगे , मुन्ना भुरळे , करण कोळेकर , बबलू सावंत , संतोष माने ,

यांच्यासह श्रीकांत आण्णा घाडगे मित्र परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button