मतीमंद महिलेवर अत्याचार करणाऱ्यास 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा…
सोलापूर ः
प्रतिनिधी
मतीमंद महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुरज केंद्रे यांनी 10 वर्षे सक्तमजुरी व 12 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
गणेश अभिमन्यू माने (वय 42, रा. कौठाळी, ता. उत्तर सोलापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पिडीत मतीमंद महिलेच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरुन सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यातील पिडीता ही मतीमंद असून ती अपंगदेखील आहे. 6 डिसेंबर 2020 रोजी रात्री पिडीता ही तिच्या घरातील खोलीत झोपली असता यातील आरोपी गणेश माने याने पिडीतेच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. याबाबत सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक देवडे यांनी तपास करून आरोपीस अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून दिले.
याप्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश केंद्रे यांच्यासमोर झाली. या खटल्यात सरकारच्यावतीने 9 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पिडीतेचा भाऊ आणि डॉक्टरांची साक्ष महत्वाची ठरली. सरकारी वकिलांचा महत्वपूर्ण युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश केंद्रे यांनी आरोपी गणेश माने यास बलात्कारप्रकरणी 10 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड आणि दंड नाही भरला तर 3 महिने साधी कैद, भादंवि 323 मध्ये 1 वर्ष सक्तमजुरी व 1 हजार रुपये दंड आणि दंड नाही भरला तर 1 महिला साधी कैद आणि अपंग व्यक्तीचे अधिकार कायदा कलम 92 नुसार 1 वर्षे सक्तमजुरी व 1 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास 1 महिना साधी कैदेची शिक्षा सुनावली.
याप्रकरणी सरकारच्यावतीने ॲड. शीतल डोके यांनी तर आरोपीच्यावतीने ॲड. सागर पवार यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलिस कर्मचारी रंजना जमादार यांनी काम पाहिले.
…………………………………………………………..
हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा
आपली उपस्थिती प्रार्थनीय