ईच्छा भगवंताची संस्थेचे मार्गदर्शक अनिल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आज स्नेह मेळाव्याचे आयोजन….
यंदाही ईच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीने पठाण शहावली दर्गा उरुस जल्लोषात होणार संपन्न विविध क्षेत्रातील मान्यवरांची सोहळ्याला राहणार लक्षणीय उपस्थिती....
सोलापूर
आज रविवार रोजी सायंकाळी ७ वा. जाईजुई नगर राजस्व नगर लागत चौडेश्वरी मंदिर समोर नवीन RTO ऑफीस रोड ईच्छा भगवंताची फॉर्म हाऊस सोलापूर येथे सालाबाद प्रमाणे यंदाच्या ही वर्षी पठाण शहावाली बाबा दर्गा उरुस निमित्त देवकार्य व ईच्छा भगवंताची संस्थेचे मार्गदर्शक श्रीयुत अनिल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे .या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर प्रामुख्याने हजेरी लावत असतात . युवा नेते अनिल दादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेह भोजनाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे .
यानिमित्ताने या सोहळ्यास उपस्थित असलेल्या मान्यवरांसमवेत सोलापूरच्या विविध विकास कामांवर,राजकीय घडामोडींवर , विशेषत: चर्चा होत असते . या सोहळ्याचे संपूर्ण नियोजन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मामा जाधव यांच्या नेतृत्वात व माजी नगरसेवक नागेश आण्णा गायकवाड , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव, चंद्रकांत ब्रदर जाधव, राजू दादा जाधव यांच्या अधिपत्याखाली करण्यात येत असते .या सोहळ्याला तमाम सोलापूर शहर – जिल्हा वासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आग्रहाचे निमंत्रण आयोजक ईच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आले आहे …