maharashtrapoliticalsocialsolapur

दिवंगत उद्योगपती स्व. रतन जी टाटा यांचे नाव नेहमी अजरामर राहील :- संतोष भाऊ पवार { जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी}…

देशाच्या विकासाला चालना देणारे दिवंगत उद्योगपती स्व. रतनजी टाटा यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आदरांजली...

सोलापूर

बुधवारी रात्रीच्या सुमारास देशाच्या विकासाला चालना देणारे महान उद्योगपती दिवंगत स्व.रतन जी टाटा यांचे वृद्धपकाळाने निधन झाले . भारताचा खरा रत्न काळाच्या पडद्याआड गेल्याने विविध स्तरातून शोक व्यक्त करण्यात आला . दिवंगत स्व.रतन टाटा यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण भारत देश पोरका झाल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या .शतकातील सर्वोत्तम उद्योजक म्हणून टाटा यांचे योगदान अनमोल आहे .भारताच्या उद्योग क्षेत्रासह विज्ञान , तंत्रज्ञान ,संशोधन विकास या तमाम क्षेत्रात टाटांचे कार्य एकमेव अद्वितीय आहे.रतन जी टाटा उद्योजक म्हणून अव्वल होतेच .पण एक माणूस म्हणून मध्यमवर्गीय भारतीयांचे ते प्रेरणास्थान होते.”आम्ही माणसही घडवितो ” हे रतन टाटा यांच्या जीवनाचा मंत्र होता .म्हणूनचं टाटा समुहातील कामगारांसह सामान्य कुटूंबातील उद्योगक्षम युवकांना टाटांनी कुटूंब मानले. आधुनिक भारताच्या उभारणीत रतनजी टाटा यांचे योगदान बहुमोल आहे.

त्यांच्या निधनाने आपला देश एका महान विभूतीला मुकला आहे.

आपण सर्वच रतनजी टाटा यांच्या जीवनाचे साक्षीदार आहोत. टाटा ट्रस्ट ही केवळ संस्था नव्हे तर सामान्य माणसाच्या जगण्यातला ‘विश्वास’ आहे. ‘आधार’ आहे. आपण सर्वच रतनजी टाटा यांच्या जीवनाचे साक्षीदार आहोत. टाटा ट्रस्ट ही केवळ संस्था नव्हे तर सामान्य माणसाच्या जगण्यातला ‘विश्वास’ आहे. ‘आधार’ आहे.
त्यामुळे त्यांच्या या अनमोल योगदानाच्या सन्मानार्थ राज्यात शहर – जिल्हा स्तरावर उद्योगपती दिवंगत स्व. रतनजी टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्या बाबतचे अधिकृत पत्र राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील जी तटकरे साहेब यांच्या आदेशान्वये काढण्यात आले होते.

त्या नुसार सोलापुरात जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार,प्रदेश उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव,कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान,प्रदेश उपाध्यक्ष आनंद दादा चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात महान उद्योगपती दिवंगत स्व. रतनजी टाटा यांच्या फोटोस जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या हस्ते पुष्पहार घालून मेणबत्ती लावून गुलाबपुष्प वाहून अभिवादन करण्यात आले.यावेळी “अमर रहे अमर रहे रतन टाटा अमर रहे*अश्या घोषणा देण्यात आल्या..

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान , सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव,शहर मनोज शेरला
OBC सेल अध्यक्ष अनिल छत्रबंद,सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, कामगार विभाग अध्यक्ष मार्तंड शिंगारे,कार्याध्यक्ष संजय सांगळे,सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे , कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, मदन मुळे यांची उपस्थिती होती…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button