माजी दुग्धविकास मंत्री कै आनंदराव देवकाते यांच्या स्मृतिस महादेव कोगनुरे यांनी दिला उजाळा…

सोलापूर
महाराष्ट्र राज्याचे माजी दुग्धविकास मंत्री व सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून समाजकार्य करणारे सहकार चळवळीतील नेते म्हणून परिचित असणारे कै आनंदराव देवकाते यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राजूर तालुका दक्षिण सोलापूर येथे एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर तालुक्याचे काँग्रेस चे नेते महादेव कोगनुरे यांनी कै आनंदराव देवकते यांच्या स्मृतिस उजाळा देत प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.यावेळी माजी सभापती अशोक देवकते, राधाकृष्ण पाटील, अप्पाशा मंदोली, राहुल देवकते, माझी जि प सदस्य आप्पासाहेब काळे,राजुर गावचे उपसरपंच सतीश देवकते, औराद चे नामदेव बंडगर, संजवाड चे माजी सरपंच अमोगसिद्ध बोलगुंडे, बनसोडे सर व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ
माजी दुग्धविकास मंत्री कै आनंदराव देवकाते यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना महादेव कोगनुरे, माजी सभापती अशोक देवकते, माजी जिल्हा परिषद सदस्य राधाकृष्ण पाटील, अप्पाशा मंदोली, सुभाष देवकाते, तुकाराम मळेवाडी, विकास पाटील आदी.