अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत… ब्रम्हांडनायकांच्या चरणी इच्छा भगवंताची परिवाराचं साकडं….
अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी केली स्वामींच्या पादुकांची पूजा...
सोलापूर –
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यावी यासाठी इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज समाधी स्थळ येथे महाराजांच्या पादुकांची धार्मिक विधिवत पूजन करून नतमस्तक होत अजित पवार हेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी साकडं घातलं.
त्याचप्रमाणे श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात किसन जाधव यांनी महाआरती केले आणि अन्नछत्र येथे देखील भेट देऊन महाराजांकडे साकडे घातलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील कार्यकर्त्यांची इच्छा असते त्यांचा नेता मुख्यमंत्री व्हावा आपल्या नेत्याला मोठं पद मिळावं प्रत्येक कार्यकर्त्याला हे वाटत असतं त्यात कार्यकर्त्यांचं अजित पवारांवर खूप प्रेम आहे.
कार्यकर्त्यांच्या मनातील मुख्यमंत्रीपदाची इच्छा पूर्ण होवो असं साकडं श्री क्षेत्र अक्कलकोट येथील ब्रह्मांडनायक स्वामी समर्थांकडे साकडं घातलं असल्याचं यावेळी किसन जाधव म्हणाले महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अनेक धाडसी निर्णय जनहिताच्या कल्याणासाठी अनेक योजना त्यांनी अमलात आणली. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला घवगवीत यश मिळालं त्यामुळेच आपला नेता मुख्यमंत्री व्हावा यासाठीच आज स्वामी समर्थांकडे साकडे घातलं .
आम्हाला नक्की खात्री आहे अजित पवार हेच मुख्यमंत्री होतील अशी आशा देखील जाधव यांनी व्यक्त केले. याप्रसंगी संतोष पुटाणे जाधव, संतोष गायकवाड, हुलगप्पा शासम, पवन बेरे महादेव राठोड सह इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे सदस्य आदींची उपस्थिती होती…