maharashtrapoliticalsocialsolapur

तरुणांच्या जल्लोषपूर्ण वातावरणात माकप च्या भव्य दिव्य पदयात्रेचे महर्षी मार्कंडेय मंदिर येथे समारोप….

लाल झेंडे,लाल शेले,लाल टोपी, लाल सलामी देत ढोल ताशाच्या तालावर थिरकली तरुणाई...

 

सोलापूर

दिनांक – सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. या मतदार संघात अन्य राजकीय पक्षाच्या मार्फत अमिष दाखवले,खोट्या आश्वासनाची खैरात दिली त्याला बळी न पडता रखरखत्या उन्हात पदयात्रेत सामील झालात.त्याबद्दल सर्वांचे आभार मानले. एच ध्यास शहर मध्य चा विकास हे एक कलमी कार्यक्रम राहील.आपण खंबीर साथ देऊन 20 तारखेला क्रमांक 1 व असणाऱ्या कोयता हातोडा तारा या चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी केले.

दुपारी ठीक बारा वाजता बापूजी नगर येथील कॉ.आडम मास्तर यांच्या घरापासून पदयात्रा सुरुवात झाली ती पुढे गेट्याल चौक अशोक चौक पोलिस चौकी, पोटफाडी चौक,पद्मशाली चौक जामखंडी पूल, जेलरोड पोलीस ठाणे,किडवाई चौक , विजापूर वेस महर्षी मार्कंडेय मंदिर येथे समारोप करण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने लोक सामील झाले. पदयात्रेचे पहिले टोक बापूजी नगर तर शेवटचे टोक विश्व लाईट हाऊस समोर होते. सर्व तरुण कार्यकर्ते लाल झेंडे,लाल शेले लाल टोपी घालून लाल सलामी देत ढोलताशाच्या तलवार बेभान होऊन थिरकली.

 

सजवलेल्या प्रचार रथावर उमेदवार कॉ नरसय्या आडम मास्तर,त्यांच्या पत्नी कामिनी आडम, पक्षाचे जिल्हा सचिव ॲड एम एच शेख, नसीमा शेख,रे नगर चेअरमन कॉ.नलिनी कलबुर्गी, सचिव युसुफ शेख मेजर, रियाज सय्यद, दिनेश अण्णा घोडके आदींची उपस्थिती होती.सर्वांना हात जोडून 1 नंबर ला मतदान करा.असे आवाहन करत होते.ठीक ठिकाणी मतदारांनी औक्षण करत सत्कार केले.
या पदयात्रेत आडम मास्तर यांचे कुटुंबीय मुले ॲड.राज,डॉ.किरण.इंजि.निलेश मुली सौ.अरुणा गेंट्याल ,डॉ.नीलिमा, सुना डॉ.रोहिणी, सौ.रजनी, नातू स्वाक्ष,नात स्तुती व जावई आदींचा समावेश होता.

विजापूर येथे आझादी बचाव चे संस्थापक अजीज पटेल यांनी jcp क्रेन लावून 100 किलो वजनाचा भव्य असा हार घालून सत्कार केले व फटाक्यांची आतषबाजी केली.सारे वातावरण दुमदुमून गेले.

जय मार्कंडेय चा नारा देत पदयात्रेचा समारोप झाला.

या पदयात्रेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव मंडळ व्यंकटेश कोंगारी, सदस्य सुनंदा बल्ला, शेवंता देशमुख, कुरमया म्हेत्रे, मी.हनीफ सातखेड, प्रा.अब्राहम कुमार रंगपा मेरेड्डी, शंकर म्हेत्रे व जिल्हा समिती सदस्य आणि असंख्य कार्यकर्ते सह हजारोंच्या संख्येने नागरिक सामील झाले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button