कोणत्याही आमिषाला व भूलथापांना बळी पडता लिंगायत गवळी समाज विजयकुमार देशमुख यांनाच मतदान करणार- गवळी समाज बांधव सर्व गवळी समाज बांधवांना, शिवशरणार्थ…
सोलापूर
शहर उत्तर मधील सर्व आपल्या लिंगायत गवळी समाज बांधवांना घरोघरी महायुतीचे उमेदवार श्री विजयकुमार ( मालक) देशमुख यांना पाठिंबा देणे बाबतचे बैठकीचे निमंत्रण पाठवून सर्व गवळी समाज बांधव बैठकी साठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात अन एकमुखाने श्री विजयकुमार ( मालक) देशमुख त्यांना आपण पाठिंबा दिला आहे.आपण कोणत्याही आमिषाला व भूलथापाना बळी न पडता त्यांना भरघोस मतांनी निवडून देणार आहे. त्यात तीळ मात्र शंका नाही.
आपल्या लिंगायत गवळी समाजातील शहर उत्तर मध्ये मतदार नसलेल्या लोकांना सोबत घेऊन खोट्या थापा मारण्यासाठी व गवळी समाजात दिशाभूल करण्यासाठी अखिल भारतीय कौटुंबिक महासंघ स्थापन करून स्वतःची राजकीय पोळी भाजुन घेण्यासाठीसाठी ज्ञानेश्वर (देवा) अंजिखाने नावाचा स्वयंघोषित अध्यक्ष निर्माण झाला आहे.
ह्या ज्ञानेश्वर (देवा) अंजिखाने नामक अखिल भारतीय कौटुंबिक महासंघाच्या अध्यक्ष म्हणुन कोणालाही विश्वासात न घेता स्वतःला अध्यक्ष घोषीत करून व स्वतःच्या सख्या भावाला सचिव करून सर्व सहकार्यांची पण दिशाभूल करून कौटुंबीक संघटना तयार केलीली आहे.
मा.अजित दादा पवार यांनी त्यांच्या विशेष निधीतून शासनान मंजूर केलेला गवळी समाज महालक्ष्मी सांस्कृतिक भवन (शेळगी) येथील समाज मंदिर ही यांनी दिशाभूल करून दुसरीकडे वर्ग करून घेतले आहे. सदरची समाजासाठी मंजूर वास्तू स्वतःच्या अखिल भारतीय कौटुंबिक संघटनेच्या माध्यमातून लाटण्याच्या उद्देश या स्वयं घोषीत अध्यक्षा चा आहे का ?
या स्वयंघोषीत अध्यक्ष यांना कुवत नसतांना 2 वेळा व यांची पत्नी यांना 1 वेळा भारतीय जनता पार्टी ने उमेदवारी देऊन निवडून आणलं पण यांनी विधान परिषद निवडणूकीत पक्ष्याच्या विरोधात जात अधिकच्या लक्ष्मी दर्शनासाठी पक्षास वेठीस धारण्याचं काम केलं असल्याने व यांच्या प्रभागाचे दोन भाग झाल्या मुळें त्यांची उमेदवारी पक्षाने कट केली असावी.
या उलट भारतीय जनता पार्टी ने गवळी समाजातील उच्च शिक्षित भगिनीला ना उमेदवारी देऊन निवडून पण आणलं अन त्यांना स्थायी समिती वर पण संधी दिली आहे.
स्वतःचे पक्षाच्या विरोधात केलेलं गैरप्रकार झाकण्यासाठी वारंवार माझं तिकीट कापलं तिकीट कापलं म्हणुन भारतीय जनता पार्टी च्या नावाने बोंब मारत हा स्वयंघोषित अध्यक्ष फिरत आहे का ? व गवळी समाज बांधवांना वेठीस धरून दिशाभुल करत आहे.
हे स्वयंघोषित अध्यक्ष स्वतःच्या मुलाला मध्य विधानसभा मतदार संघात भा.ज.पा चं काम करायला लावत आहे. शहर उत्तर मधील गवळी समाज बांधवांना व शहर उत्तर मधील भा.ज.पा.मधील कार्यकर्ते याचं भविष्य अडचणीत आणायचं काम हा स्वयंघोषीत अध्यक्ष करत आहे.
महायुती सरकारने. श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ दिले.व मा.अजित दादा पवार यांनी त्यांच्या विशेष निधीतून गवळी समाज महालक्ष्मी सांस्कृतिक भवन साठी ५० लाख रु मंजूर केले असतांना हा स्वयंघोषीत अध्यक्ष स्वतःच्या स्वार्थापोटी महायुती सरकारच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन करत आहे
गवळी समाज बांधवांच्या घरी मिठाईचे बॉक्स व पत्रक हे स्वयं घोषित अध्यक्ष पाठवत आहे.या मिठाई च्या आमिषाला गवळी समाज बळी पडणार नाही.व यातुन समाज बांधवांचे मत परिवर्तन होणारं नाही हे स्वयंघोषीत अध्यक्ष यांनी लक्षात घ्याव .
स्वतःच्या राजकीय पोळी भाजुन घेणाऱ्याया स्वयं घोषित नेत्याने महानगरपालिकेच्या माध्यमातून समाजाच्या किती तरुणांना नोकऱ्या दिला, किती तरुणांना टेंडर मिळवून दिले,किती लाभ मिळवून दिला आहे हे जाहीर करावं व स्वतःच आत्म परीक्षण करून पाहावं की आपण आपल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात काय काम केली.
लिंगायत गवळी समजा मध्ये स्वतःच्या नावाला किंमत उरली नसल्यानं शहर उत्तर मधील भा.ज.पा.चे कार्यकर्ते गवळी समाज बांधवांचे नाव स्वतःच्या पत्रकात वापरून लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे स्वयं घोषित अध्यक्ष यांनी केलं आहे .
अखिल भारतीय कौटुंबिक महासंघाच्या अध्यक्ष यांनी किती ही समाज बांधवांची दिशाभूल केली अन किती ही मिठाईचे बॉक्स वाटले तरी गवळी समाजातील गवळी बांधवांचे मत परिवर्तन होणार नाही.
सर्व शहर उत्तर मधील गवळी समाज आवाहन आहे की अश्या भूल थापा व आमिषाला बळीं न पडता समाजाने बैठकीत एकमुखी पाठिंबा दिलेले उमेदवार विजयकुमार (मालक) देशमुख यांना प्रचंड मतांनी विजयी करावं
आपले विनीत
संजय शहापुरकर, विजयदत्त लकडे, संजय जानगवळी, आप्पा शहापुरकर,राहुल दहीहंडे, सिद्राम बडवणे ,पोपट बहिरवाडे,संतोष खंडेराव ,मनोज मलकूनाईक, अक्षय अंजिखाने, विनोद बडवणे, शिव दहीहंडे, आप्पा पंगुडवाले, शंकर गुळसकर,बबलू अंजिखाने, शुभम हुचचे, सागर दहीहंडे,नागू मलकूनाईक