आगामी विधानसभा निवडणुक – 2024 ची मतदान प्रक्रिया 20 नोव्हेबर रोजी होणार आहे. सदरी निवडणुक प्रक्रिया निर्भय व शांततेत पार पाडावी याकरीता सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व राज्य राखीव पोलीस दल, कर्नाटक येथील पोलीस दलाच्या वतीने सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रातील मौजे बोरामणी, कासेगाव, दक्षिण सोलापूर, मौजे नान्नज व बीबीदारफळ ता.उत्तर सोलापूर या गावाच्या प्रमुख मार्गावरून या गावातुन रूट मार्च (पथ संचलन) घेण्यात आले आहे.
सदर रूट मार्चचे दरम्यान वर नमूद गावातील नागरिकांना आदर्श आचारसंहिता व निवडणुक अनुषंगाने कायद्यांचे पालन करावे, सोशल मिडियाच्या माध्यामातुन आक्षेपार्ह पोस्ट, संदेश, ऑडिओ व व्हिडीओ प्रसारित करू नये, आपले उमेदवाराचा प्रचार करीत असताना संविधानिक भाषेचा वापर करावा, आक्षेपार्ह भाषण करू नये व वैयक्तिक टिका टिप्पणी करणे टाळावे वगैरे सूचना पोलीस वाहनांच्या ध्वनी क्षेपका वरून देण्यात आल्या आहेत.
सदरचे पथसंचलन (रूट मार्च) मा.श्री.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, मा.श्री.प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, मा.श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री.राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक,सोलापूर तालुका,पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक मनोज अभंग, श्रेणी प पोलीस उपनिरीक्षक राठोड व अंमलदार व राज्य राखीव पोलीस दल, कर्नाटक येथील पोलीस दला मधील अंमलदार यांनी सहभाग नोदविला आहे..
Back to top button