अँड राजेश कांबळे खून खटल्यास पुन्हा प्रारंभ : मयताच्या पत्नीने साक्ष नोंदवली…
सोलापूर
दिनांक- एडवोकेट राजेश श्रीमंत कांबळे वय 45 राहणार 43, ब्रह्मचैतन्य नगर नवीन आर टी ओ सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी आरोपी संजय उर्फ बंटी महादेव खरटमल, अँड सुरेश तारू चव्हाण व श्रीनिवास महांकाळी येलदी यांच्यावर भरलेल्या खटल्याच्या सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.जे.जे.मोहिते यांच्यासमोर सुरू झाला.
यात हकीकत अशी की, दिनांक 8-6-2019 रोजी यातील मयत अँड राजेश कांबळे हा सकाळी अकरा वाजेचे सुमारास पक्षकारांना भेटून एका तासाने परत येतो असे त्याच्या पत्नीस सांगून त्याच्या घरातून मोटरसायकलवर निघून गेला होता.
त्यानंतर त्याच्या पत्नीने दुपारी बाराच्या सुमारास फोन लावला असता मयत राजेश याने मी बंटीच्या घरी आहे केस संदर्भात चर्चा चालू आहे असे सांगितले .त्यानंतर त्याची पत्नी त्याचा भाऊ यांनी फोन लावला असता मयत राजेश याचा फोन बंद लागत होता. रात्री शोधा शोध केली तरी मयत राजेश कांबळे हा मिळून आला नाही. त्यावर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती. तपासादरम्यान यातील आरोपी बंटी खरटमल याच्यावर संशय बळावला तसेच पोलिसांना बंटी खरटमल याच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे दिसून आले. त्यावेळी पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत पाहिले असता मयत राजेश कांबळे याचे हात, पाय,धड व मुंडके हे तोडून दोन प्लास्टिक बॅगेत भरलेले दिसून आले. त्यावर पोलिसांनी खुनात सहभाग असलेले वरील तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले होते.
खटल्याच्या सुनावणीच्या वेळी मयताची पत्नी अस्मिता कांबळे हिने दि:-8/6/2019 रोजी पती राजेश हे ज्युपिटर मोटारसायकल वरून निळ्या लायनींगचा शर्ट व गडद निळ्या रंगाची पॅन्ट घालून तसेच दोन सोन्याच्या चैन, दोन सोन्याच्या अंगठ्या व एक चांदीची अंगठी असे घालून पक्षकारांना भेटून एक तासात परत येतो असे सांगून गेले होते, दुपारी बाराच्या सुमारास तिने मयत राजेश यास फोन केला होता, तो बंटीच्या घरी आहे असे मयत राजेश याने सांगितले होते त्यानंतर फोन लागला नाही, तसेच 12/6/2019 रोजी मयत राजेश याचे प्रेत तिने शवगृहात ओळखले. तपासादरम्यान दागिन्यांच्या ओळख परेड मध्ये दागिने ओळखले, दागिने खरेदी केल्याच्या पावत्या ओळखल्या, ओळख परेड मध्ये ओळखलेले दागिने कोर्टात परत ओळखले अशी महत्त्वपूर्ण साक्ष नोंदविली.
आरोपींच्या वकिलांनी घेतलेल्या उलट तपासात साक्षीदाराने नकारात्मक उत्तरे दिली.
या खटल्याची पुढील सुनावणीस 17/12/2024 ही तारीख नेमण्यात आली.
*या खटल्यात विशेष सरकारी वकील अँड. उज्वल निकम, मूळ फिर्यादीतर्फे अँड.मिलिंद थोबडे अँड.विनोद सूर्यवंशी तर आरोपी नंबर 1तर्फे अँड राजेंद्र फताटे आरोपी नंबर 2 तर्फे अँड नागराज शिंदे आरोपी नंबर ३ तर्फे अँड जयदीप माने हे काम पाहत आहेत.*