crimemaharashtrapoliticalsocialsolapur

शिक्षा झालेल्या पोस्टमास्तराची शिक्षा अपीलात रद्द:- ॲड. शशी कुलकर्णी…

सोलापूर :- वळसंग पोस्ट ऑफिस मधील सहाय्यक पोस्ट मास्तर सिध्देश्वर विठ्ठल जाधव, वयः ५७ वर्षे, रा. गणेश नगर सोलापूर यांची, पोस्टातील रोख रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी खटल्यात सोलापूर येथील सत्र न्यायालयाने अक्कलकोट न्यायालयाने दिलेली शिक्षा रद्द करुन त्याची निर्दोष मुक्तता केली.

 

 

याची हकिकत की, श्री. सिध्देश्वर विठ्ठल जाधव हे ३०/०५/२०१२ रोजी वळसंग पोस्ट ऑफिसमध्ये सब-पोस्टमास्तर या पदावर कार्यरत होते. दि.३१/०५/२०१२ रोजी त्यांना पुणे येथे ट्रेनिंगला जावयाचे असलेने दि.३०/०५/२०१२ रोजी दिवसभर कामकाज पाहून पोस्ट ऑफिसच्या सर्व चाव्या दुसऱ्या स्टाफला दिल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी चार्ज घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी कॅशबॉक्सची तपासणी केली असता, त्यामध्ये एकुण रक्कम १,७५,०५३/- रुपये इतक्या रक्कमे, या ऐवजी रु.१,५८,५६७/- इतकी रक्कम आढळली, त्यामुळे उर्वरीत रक्कमेचा म्हणजेच रु.१६,४८६/- ऐवढया रक्कमेचा हिशोब लागत नव्हता. त्यामुळे सोलापूर येथील पोस्ट कार्यालयाने दि.१७/१२/२०१२ रोजी त्यांच्या विरुध्द वळसंग पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली. त्यामध्ये गुन्हा दाखल होऊन, तपास होऊन, खटला दाखल होऊन, त्यांना अक्कलकोट कोर्टाने अपहाराच्या गुन्हासाठी एक वर्ष कैद व १ हजार रुपये दंडाची शिक्षा झाली होती. त्याविरुध्द त्यांनी अॅड. शशि कुलकर्णी, यांच्या मार्फत सोलापूर येथील सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते, त्याची सुनावणी होऊन, त्यामध्ये पोस्टमास्तर तर्फे असा युक्तीवाद केला की, सदर प्रकरणात आरोपीचा अपहाराचा उद्देश दिसुन येत नाही, फरक असलेली रु.१६,४८६/- ची रक्कम पोस्ट ऑफिसने भरुन घेतलेली आहे; हिशोबातील प्रत्येक तुटवडा हा अपहार असु शकत नाही, त्यामुळे आरोपीची शिक्षा रद्द करावी, असा युक्तीवाद करण्यात आला. सदरच्या युक्तीवाद विचारात घेऊन सत्र न्यायालयाने आरोपीचे अपील मंजूर करुन, खालील कोर्टाने दिलेली शिक्षा रद्द करुन, आरोपी पोस्टमास्तरची अपहाराच्या आरोपातुन निर्दोष मुक्तता केली.

 

 

सदरकामी पोस्टमास्तर तर्फे अॅड. शशि कुलकर्णी, अॅड. गुरुदत्त बोरगावकर, अॅड. स्वप्निल सरवदे, अॅड. रणजीत चौधरी, अॅड. प्रणव उपाध्ये, तर सरकार तर्फे अॅड. के.ए. बागल यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button