maharashtrapoliticalsocialsolapur

पदयात्रेवेळी मायमाऊलींचा देवेंद्र कोठे यांना आशीर्वाद…

देवेंद्र कोठे यांच्या पदयात्रेस नागरिकांचा प्रतिसाद...

सोलापूर: प्रतिनिधी

राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेसह महिलांसाठी राबवलेल्या अनेक योजनांमुळे महिला सक्षम बनत आहेत. त्यामुळे शहर मध्ये मतदारसंघात भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्याच पाठीशी महिला खंबीरपणे उभे राहतील, असा आशीर्वाद पदयात्रेत सहभागी झालेल्या महिलांनी देवेंद्र कोठे यांना दिला

 

प्रभाग क्रमांक ९ आणि १२ मध्ये भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए) महायुतीचे शहर मध्य विधानसभेचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत मोठ्या संख्येने महिला- भगिनी सहभागी झाल्या होत्या. भाजपाचे झेंडे, शेले, टोप्या परिधान करून मोठ्या उत्साहात भारतमाता की जय, वंदे मातरम, देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो, देवेंद्र कोठे आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात येत होत्या.

 

 

आरकाल गार्डन येथून सुरुवात झालेली पदयात्रा ज्ञानेश्वर नगर, अक्कलकोट नाका, वज्रेश्वरी नगर, यल्लालिंग मठ, पद्म नगर क्रीडांगण, स्वातंत्र्यसैनिक नगर, कर्णिक नगर चौक, कर्णिक नगर परिसर, एकता नगर परिसर, देवी मंदिर, राजा गणपती, राघवेंद्र टॉवर परिसर, गीता नगर मार्गे गीता मंदिर येथे विसर्जित झाली.

 

 

यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहर चिटणीस बजरंग कुलकर्णी, किरण भंडारी, भीमाशंकर जवळे, ज्ञानेश्वर गवते, अमोल शेळे, प्रभाकर यादगिरी, सुरेश चिककळी, शिवा कोळी, श्रीनिवास दिड्डी, काशिनाथ मोगली, नरेश यलगम, श्री आडम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button