10 व 11 नोव्हेंबर रोजी 248 शहर उत्तर विधानसभा मतदार संघातील मतदार सुविधा केंद्रावर टपाली मतदान…
सोलापूर
दि.9 (जिमाका):- मा. भारत निवडणूक आयोगाचे सुचनांन्वये 248 सोलापूर शहर उत्तर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे कामकाज सुरू असून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी निवडणूक कर्तव्यावर असणारे अधिकारी व कर्मचारी यांचे मतदार सुविधा केंद्रातील ( Facilitation Center) मतदान दि. 10 नोव्हेंबर 2024 ते दि. 11 नोव्हेंबर 2024 या कालावधीत नार्थकोट प्रशाला सोलापूर येथे सकाळी 10 ते सायं 5 वा. पर्यंत होणार आहे. या करीता करमणूक शाखा ,जुने जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथील स्ट्राँगरूम मधून सकाळी 9 वा. टपाली मतपत्रिका काढण्यात येतील व मतदाना नंतर परत स्ट्राँगरूम मध्ये ठेवण्यात येतील.
तरी सदर टपाली मतत्रिका करमणूक शाखा , जुने जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथील स्ट्राँगरूम मधून काढते व ठेवते वेळी तसेच सुविधा केंद्रातील मतदान प्रक्रियेदरम्यान 248 सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघातील उमेदवार अथवा उमेदवाराकडून नियुक्त अधिकृत मतदान प्रतिनिधी यांनी नियुक्त् पत्रासह करमणूक शाखा , जुने जिल्हाधिकारी कार्यालय व मतदान केंद्रावर येथे उपस्थित रहावे. अशी माहिती 248 सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघ, निवडणूक अधिकारी यांनी दिली.