महाराष्ट्र राज्य कोळी महासंघाचा देवेंद्र कोठे यांना जाहीर पाठिंबा…
राष्ट्रीय युवक संघाचे अध्यक्ष चेतन दादा पाटील आणि अरुण लोणारी यांच्या हस्ते पत्र प्रदान...

सोलापूर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठी कोळी समाजाची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य कोळी महासंघाचा शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. याबाबतचे पत्र शनिवारी राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांचे चिरंजीव आणि राष्ट्रीय युवक संघाचे अध्यक्ष चेतन पाटील, अरुण लोणारी यांच्या हस्ते उमेदवार देवेंद्र कोठे यांना प्रदान करण्यात आले.
कोळी समाजासह संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठीचे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए) महायुतीचे धोरण उपयुक्त आणि परिणामकारक असल्याची कोळी समाजातील पदाधिकारी तसेच समाज बांधवांची खात्री पटल्याने महाराष्ट्र राज्य कोळी महासंघातर्फे पाठिंबा देण्यात येत असल्याचे राष्ट्रीय युवक संघाचे अध्यक्ष चेतन पाटील आणि अरुण लोणारी यांनी सांगितले.
आदिवासी कोळी समाजाचे जातींचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळण्याकरिता अनेक वर्षांपासून प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु यात अद्याप कोणतीही सुधारणा झालेली नाही. आगामी काळात विधानसभेत कोळी समाजाचे प्रश्न मांडून कोळी समाजाला आपण न्याय मिळवून द्याल, या अपेक्षेने हा पाठिंबा देत असल्याचे कोळी महासंघाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे शहर अध्यक्ष राम वाकसे, माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे, विश्वनाथ प्याटी, मनोज कलशेट्टी, प्रभाकर गंपले, आप्पू कडगंची, प्रमोद सलगर, बसवराज कोळी, सिद्धाराम खजुरगी, विजय महिंद्रकर, भीमाशंकर जावळे, भीमाशंकर बिराजदार, दशरथ पाथरुट, अंबण्णा कोळी, शरणप्पा डंके, गजानन शेजाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.