राष्ट्रवादी शहरातील तिन्ही मतदार संघात महायुतीला आघाडी देणार महापालिकेत समान न्यायची अपेक्षा- जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार…
महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाने शिवसेने प्रमाणेच राष्ट्रवादीला ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवेळी २५ जागा द्याव्यात ..प्रदेश उपाध्यक्ष मा.गटनेते किसन भाऊ जाधव...

आमचं ठरलय !
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक द्या :- कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान
महायुतीत शिवसेने प्रमाणेच राष्ट्रवादीला समान न्याय देऊ राष्ट्रवादीच्या सर्व मागण्या आम्हाला मान्य – नरेंद्र काळे भाजपा शहराध्यक्ष
राष्ट्रवादी भवन कार्यालयात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार आ.विजयकुमार देशमुख, आ.सुभाष देशमुख आणि देवेंद्र कोठे यांचे स्वागत सत्कार सोहळा व राष्ट्रवादी पदाधिकारी परिचय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला महायुतीच्या तिन्ही उमेदवारांचा सत्कार सोहळा महायुती नावाचे फेटे बांधून पुष्पगुच्छ देऊन दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खा.सुनील जी तटकरे साहेब यांच्या आदेशान्वये व
मार्गदर्शनाखली राज्यातील महायुतीच्या एकत्रीकरण सुत्रानुसार सोलापुरात ही महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेने स्थानिक स्वराज्य निवडणुका साठी २५ जागांची मागणी केली आहे त्या प्रमाणे राष्ट्रवादीला ही २५ जागा मिळाव्यात आणि सम – समान न्याय द्यावा अशी मागणी केली.
महायुतीचे तिन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील त्यासाठी राष्ट्रवादीचा प्रत्येक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ता मनापासून जोमाने काम करेल.
महायुतील आपण सर्वजण मिळून एकत्रित ताकत लाऊन सर्वोतोपरी प्रयत्न करू आणि जिंकू सोलापूर शहरातील तिन्ही विधानसभेवर महायुतीचा झेंडा फडकवू.असे मनोगत जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, कार्याध्यक्ष जुबेर बागवान आनंद मुस्तारे महीला अध्यक्ष संगीता जोगदनकर युवक अध्यक्ष सुहास कदम यांनी व्यक्त केले.
यानंतर भाजपा चे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी आपल्या मनोगतात महायुतीत यूतीधर्म कसा पाळावा हे उत्तम उदाहरण सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे असे कौतुक करून येणार्या महापालिकेत राष्ट्रवादीला सन्मान पूर्वक जागा मिळतील महायुतील शिवसेना प्रमाणेच राष्ट्रवादीला देखील समान न्याय देण्याची भुमिका घेऊ असे प्रतिपादन केले…
उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख,सुभाष देशमुख देवेंद्र कोठे यांनी त्यांच्या मनोगतात सर्व उमेदवारांचे एकत्रित सत्कार करून सर्व पदाधिकारी परिचय बैठक घेतली यांचे कौतुक करून राष्ट्रवादी च्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांवर अन्याय होणार नाही महायुतीचा धर्म पाळला जाईल सर्वांचा सन्मान राखला जाईल असा शब्द देत सर्वांना विश्वासात घेऊन ही विधानसभा निवडणुक आपल्या एकत्रित ताकतीने लढून विजयी होवू असे प्रतिपादन करत राष्ट्रवादीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी घड्याळ म्हणजेच कमळ आहे असे समजून प्रचारात आघडी घ्यावी असे आवाहन देखील सर्व उमेदवारांनी केले ….
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, प्रदेश उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव, कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान,माजी आमदार रविकांत पाटील , माजी नगरसेवक नागेश गायकवाड, जनरल सेक्रेटरी प्रमोद दादा भोसले,माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे
जेष्ठ नेते हेमंत चौधरी,
अनिल उकरंडे,OBC सेल प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सलीम नदाफ , महेश निकंबे,
महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर,कार्याध्यक्ष चित्रा कदम युवक अध्यक्ष सुहास कदम कार्याध्यक्ष तुषार जक्का,प्रदेश युवक चे साजिद पटेल,चेतन गायकवाड,खलिल शेख ,सनी देवकते,युवक समन्वयक दत्तात्रय बडगंची , युवती अध्यक्ष किरण माशाळकर ,कार्याध्यक्ष पल्लवी पाटील ,अल्पसंख्याकचे विभाग अध्यक्ष अमीर शेख,कार्याध्यक्ष संजय मोरे , सामाजिक न्यायचे राजू बेळेनवरु ,कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, सेवादलचे प्रकाश जाधव, सिध्देश्वर आंबट,उत्तर विधानसभेचे ॲड.अमोल कोटिवाले,मनोज शेरला ,प्रकाश झाडबुके , मध्य विधानसभेचे अल्मेहराज आबादीराजे ,दक्षिण विधानसभेचे वाघमारे , भालशंकर, डॉक्टर सेलचे डॉ.संदीप माने , महेश वसगडेकर , वैद्यकीय विभागचे बसवराज कोळी, VJNT विभाग चे रुपेश भोसले ,असंघटित विभागचे मार्तंड शिंगारे,संजय सांगळे, वाहतूक सेलचे इरफान शेख ,OBC सेल चे अनिल छत्रबंद,बाबू पटेल , दिव्यांग विभाग यांच्या मल्लिकार्जुन इटकळे भाजपा चे सरचिटणीस विशाल गायकवाड ,महेश देवकर , शहर कार्यकारिणीचे तन्वीर गुलजार,भास्कर आडकी , प्रज्ञाशील गायकवाड, राजुसिंग फटफट वाले मौलाली शेख , करेप्पा जंगम ,महिला आघाडीचे कांचन पवार, प्रिया पवार , शोभा गायकवाड,सुरेखा घाडगे,संगीता गायकवाड,प्रमिला स्वामी ,जाधव
सोशल मीडिया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, सागर गव्हाणे ,शत्रुघ्न गव्हाणे ,विजय माने , सरफराज बागवान , समदानी मत्तेखाने,सिद्राम चीनकेरी,सोशल मीडिया विभागाचे संघटक सचिन चलवादी,फिरोज शेख , अमोल जगताप ,वृषभ प्याटी,माणिक कांबळे, हुलगप्पा शासम,महादेव राठोड ,मदन मुळे ,उमेश जाधव ,किरण शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी मानले ….