दरोडाच्या तयारीत असणाऱ्या अंतराज्य टोळीकडून चोरीचे महागडे स्मार्टफोन हस्तगत विजापूर नाका पोलिसांची कामगिरी….

विजापुर नाका पोलीस ठाणे कडील पोशि/अमृत सुरवसे व पोशि/समाधान मारकड असे नवरात्रीच्या अनुशंगाने पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दि. ०३/१०/२०२४ रोजी दुपारी १२.१५ वच्या सुमारास पुणे पासिंग असलेली पांढ-या रंगाची एर्टिगा एम.एच. 13-TD-2258 ही पांढ-या रंगाची एर्टिगा एम.एच. 12 TD 2238 ही गाडी संशयित रित्या हत्तुर वस्ती येथे दिसुन आल्याने पोशि/सुरवसे व पोशि/मारकड यांना सदर गाडीचा संशय आल्याने त्यांनी त्या गाडी पाठलाग करून संशयित एर्टिगा एम.एच. 12 TD 2238 ही चारचाकी वाहन ही सपोनि/गायकवाड व पोहेकॉ/सचिन हार, गणेश शिर्के, शंकर भिसे, पोशि/संतोष माने, सद्दाम आबादीराजे, स्वप्निल जाधव, हरिकृष्ण चोरमुले यांच्या मदतीने वरील संशियत पांढ-या रंगाची एर्टिगा एम.एच. 12 TD 2238 पत्रकार भवन येथील सुरभी हॉटेलच्या समोर आडवुन इसम नामे १) विशाल कृष्णाप्पा बंडीवडार वय २९ वर्षे, रा- कुमारेश्वर नगर कोर्टाच्या पाठीमागे, ता. हनगल जिल्हा हावेरी, राज्य कर्नाटक २) अनिल शिवप्पा वडर वय वर्षे, रा. नवनगर, मैलारी देवी मंदीर जवळ, ता, हनगल, जिल्हा हावेरी, राज्य कर्नाटक यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातुन दरोडासाठी लागणारे १) एक निळ्या रंगाची मुठ असलेला लोखंडी मोठा कटर, २) एक गुलाबी मुठ असलेली लहान लोखंडी कटर, ३) एक जुने लोखंडी पत्रे कापण्याचे कटर ४) एक केसरी रंगाचा लोखंडी कु-हाड, ४) एक निळ्या एक्सा ब्लेड, ५) एक लोखंडी कटावणी, ६) एक हिरवी मुठ असलेली स्क्रू ड्रायव्हर, ७) एक हिरव्या रंगाचे इलेक्ट्रीक कटर मशिन, ८) लाल तिखट न्यु पेपर मध्ये बांधलेली, ९) एक लोखंडी हातोडी विविध कंपनीचे ५ मोबाईल असे
एकुण १३,६१,५००/-/- मुद्देमाल जप्त केला.
सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान वरील अटक आरोपीतांनी व त्यांचे पळुन गेलेल्या साथीदारांनी दरोडा टाकण्याकरिता आणलेल्या एर्टिगा कारच्या पाठीमागील हॅन्डरेस्ट व पत्र्याच्या मोकळ्या जागेत पुणे व सोलापूर जिल्ह्यातील चोरी केलेले एकुण १०६ विविध कंपनीचे महागडे मोबाईल जप्त केले आहे. जप्त केलेल्या मोवाईलबाबत अधिक तपास चालु आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार साो, पोलीस उप आयुक्त (परीमंडळ) श्री विजय कबाडे साो, सहा. पोलीस आयुक्त वि २ श्री यशवंत गवारी साो, वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री दादा गायकवाड साो, पोनि श्रीमती संगिता पाटील साो (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सपोनि/गायकवाड, पोहेकॉ/सचिन हार, गणेश शिर्के, शंकर भिसे, पोकॉ/ अमृत सुरवसे, समाधान मारकड, संतोष माने, शाबोद्दीन आबादीराजे, स्वप्निल जाधव, राहुल विटकर, रमेश कोर्सेगाव व मोबाईल तांत्रिक विश्लेषक/आयाज बागलकोटे व अर्जुन गायकवाड यांनी पार पाडली…
सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत