
इसम नामे, विकास उर्फ पप्पू सुरेश दोरकर, वय-४१ वर्षे, रा. गणेश नगर, जोशी गल्ली, बाळे, सोलापूर याचेविरुध्द सन २०१८, २०२०,२०२२,२०२३ व २०२४ या कालावधीमध्ये, सामान्य नागरीकांना दमदाटी, शिवीगाळ करुन मारहाण करणे, घातक हत्यारांसह गंभीर दुखापत करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्तावाचे अनुषंगाने श्री विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांनी कार्यवाही करुन, त्यांचेकडील तडीपार आदेश क्र. २७७८/२०२४ दि.२८/१०/२०२४ अन्वये, इसम नामे, विकास उर्फ पप्पू सुरेश दोरकर, वय-४१ वर्षे, रा. गणेश नगर, जोशी गल्ली, बाळे, सोलापूर यास सोलापूर व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर पुणे येथे सोडण्यात आलेले आहे.