maharashtrapoliticalsocialsolapur

रखरखत्या उन्हात निघाले लाल वादळ …

२४९, सोलापूर शहरमध्य मधून कॉ. आडम मास्तर यांनी दाखल केले नामनिर्देशन पत्र ...

सोलापूर

दि.२८:- सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजले असून येत्या २० तारखेला मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने २४९, सोलापूर शहरमध्य विधान सभा मतदार संघातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अधिकृतरित्या माझे उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. महायुतीचा पराभव करण्यासाठी आणि जनतेला खोटी स्वप्ने विकणाऱ्या शिंदे सरकारचा पाडाव करण्यासाठी महाविकास आघाडीने चंग बांधलेला आहे. या निवडणुकीत जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आणि विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांचे धाबे दणाणल्याशिवाय सोडणार नाही. राज्यात माजलेली अराजकता आणि सत्तापिपासू यांचा पराभव करण्यासाठी जनता आता सज्ज झालेली आहे. येत्या २३ नोव्हेंबरला पुरोगामी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल आणि जनतेच्या विकासाला गती प्राप्त होईल असा विश्वास ज्येष्ठनेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी त्यांचे नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर माध्यम परिवाराशी बोलताना व्यक्त केले.

सोमवार दि. २८ ऑक्टोबर २०२४ रोजी उत्तर तहसील कार्यालय येथे २४९, सोलापूर शहरमध्य विधानसभा मतदार संघ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) च्यावतीने आपले अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केले. या प्रसंगी कॉ. एम.एच.शेख, व्यंकटेश कोंगारी, गजेंद्र दंडी, अनिल वासम, बापू साबळे, सनी शेट्टी, दीपक निकंबे, नरसिंग म्हेत्रे आदी प्रस्तावकासह कार्यकर्ते उपस्थित होते.

भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी च्या वतीने सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता २४९, सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघातून आपली उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत आबालवृद्ध कार्यकर्ते खाद्यांवर लाल झेंडा, डोक्यावर लाल टोपी, गळ्यात लाल शेले घेऊन ढोल-ताशा आणि हलगीनाद करत रखरखत्या उन्हात आडम मास्तर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, निवडून निवडून येणार कोण, मास्तर शिवाय दुसरे कोण, आडम मास्तर को लाल सलाम अशा जोशपूर्ण घोषणा देत पदयात्रा निघाली या पदयात्रेत आकर्षक असे प्रचार रथ सजविण्यात आले. या रथात आडम मास्तर यांच्या पत्नी कामिनिताई आडम, पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर, पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. एम.एच.शेख, नलिनीताई कलबुर्गी, युसुफ शेख (मेजर), सामाजिक कार्यकर्ते दिनेश घोडके, मुकरी सालार, प्रा. इरफान शेख, साथी बशीर शेख, श्रीनिवास म्हेत्रे, अकिल शेख (मेंबर) आदी मान्यवर होते.

पदयात्रा मार्ग
१) कॉ.नलिनी कलबुर्गी व युसुफ मेजर यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात – गुरुनानक चौक पासून ते गेंट्याल चौक – अशोक चौक – ताना – बाना मार्गे दत्त नगर लाल बावटा कार्यालय येथे समारोप.
२) किशोर मेहता, वीरेंद्र पद्मा यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात-गांधी नगर महालक्ष्मी मंदिर पासून ते पाण्याची टाकी शांती चौक – भद्रावती पेठ मार्गे दत्त नगर दाजी गणपती – लाल बावटा कार्यालय येथे समारोप.
३) कॉ.रंगप्पा मरेडी यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात – चांदणी चौक पासून ते फॉरेस्ट चौक वाडिया हॉस्पिटल सात रस्ता जगंदबा चौक मौलाली चौक कामगार चौक येथे समारोप.
४) अमित मंचले व शंकर म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात मसीहा चौक पासून ते सात रस्ता जगंदबा चौक मौलाली चौक कामगार चौक येथे समारोप.
५) कॉ. नसीमा शेख व व्यंकटेश कोंगारी यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात – दत्त नगर समाज मंदिर पासून ते भगवान नगर खड्डा तालीम लाल बहादूर शास्त्री प्रशाला पोटफाडी चौक पासून ते शिवराम चौक पासून ते आंध्र दत्त चौक ते लाल बावटा कार्यालय येथे समारोप.
६) कॉ.सनी शेट्टी व प्रा. अब्राहम कुमार यांच्या नेतृत्वाखाली कामगार चौक पासून ते पोटफाडी चौक शिवराम चौक आंध्र दत्त चौक ते लाल बावटा कार्यालय येथे समारोप.
७) कॉ. विल्यम ससाणे यांच्या नेतृत्वाखाली कॉ. गोदुताई परुळेकर येथून दत्त नगर लाल बावटा कार्यालय येथे सामील झाले.
८) प्रमुख रॅली – दत्त नगर लाल बावटा कार्यालय पासून ते आंध्र दत्त चौक पासून ते पद्मशाली चौक जिंदशहा मदार चौक सोशल कॉलेज चारा मैदान किडवाई चौक येथे रॅलीचे समारोप व त्यानंतर रॅली चे दुपारी १:०० वाजता जाहीर सभेत रूपांतर झाले.
या प्रसंगी कॉ. नलिनीताई कलबुर्गी, युसुफ शेख (मेजर), प्रा. इरफान शेख, साथी बशीर शेख, माकपाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर, सामाजिक कार्यकर्ते मुकरी सालार आदींनी सभेला संबोधित केले.
या प्रसंगी व्यासपीठावर नसीमा शेख, कामिनिताई आडम, व्यंकटेश कोंगारी, शेवंताताई देशमुख, सुनंदा बल्ला, रंगप्पा मरेड्डी, प्रा. अब्राहम कुमार, शंकर म्हेत्रे, म.हनीफ सातखेड, प्रहारचे जमीर शेख आदींची उपस्थिती होती.

या जाहीर सभेचा सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कॉ. ॲड. अनिल वासम यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button