Businessentertainmentmaharashtrapoliticalsocialsolapur

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सवाच्या लोगोचे अनावरण..

5 पी ब्रँडिंगद्वारे होणार सोलापूर पर्यटनाचा जागतिक प्रवास...

 

सोलापूर

 

सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन ते 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती या कालावधीत सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. याच्या लागोचे अनावरण सोलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. सुभाष देशमुख आदी उपस्थित होते.

 

या महोत्सवाचे उद्दिष्ट सोलापूर जिल्ह्याच्या पर्यटनाचा सर्वांगीण विकास करणे आहे. या माध्यमातून ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, निसर्ग व ग्रामीण पर्यटनाचा प्रचार होणार आहे. या महोत्सवाची संकल्पना 5 पी मार्केटिंग ब्रँडिंग’ या तत्वावर आधारित आहे. पहिले पी म्हणजे प्लेसेस – जिल्ह्यातील धार्मिक, सांस्कृतिक, औद्योगिक व ग्रामीण पर्यटन स्थळे. दुसरे पी’ म्हणजे पर्सनॅलिटीज – सोलापुरातील कलाकार, संशोधक, आधुनिक शेतकरी, उद्योजक. तिसरे पी म्हणजे प्रॉडक्ट्स – स्थानिक खाद्यसंस्कृती, कृषी उत्पादन व औद्योगिक निर्मिती. चौथे पी म्हणजे प्लेसमेंट – तरुणांसाठी जास्तीत जास्त रोजगार निर्मिती. पाचवे पी म्हणजे पॉल्युशन फ्री एन्व्हायर्नमेंट – वृक्षलागवड व पर्यावरण संवर्धन. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस सोमवारी सोलापूर शहराच्या दौर्‍यावर होते. त्यावेळी त्यांच्या हस्ते सोलापूर पर्यटन महोत्सवाच्या लागोचे अनावरण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, आ. समाधान आवताडे, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे व मान्यवर उपस्थित होते.

चौकट

सोलापूर पर्यटनाचा ब्रँड देशभरात उंचावणार

या पर्यटन महोत्सवामुळे सोलापूर जिल्ह्याच्या पर्यटन क्षमतेला नवे व्यासपीठ मिळणार आहे. यातून ग्रामीण व शहरी भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये पर्यटनाविषयी जागरूकता निर्माण होईल. जिल्ह्यातील नागरिकांना पर्यटन क्षेत्राशी जोडले जाण्याची संधी उपलब्ध होईल. स्थानिक उद्योग व बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळेल. जिल्ह्यात रोजगार निर्मितीला गती मिळेल, या महोत्सवामुळे सोलापूर पर्यटनाचा ब्रँड राज्यभरात आणि देशभरात उंचावणार आहे, असे आ. सुभाष देशमुख यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia