ज्ञानेश महाराव वर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करा अन्यथा येणाऱ्या काळात महाराव जिथे दिसेल तिथे चांगलाच चोप देऊ :- सुधीर बहीरवाडे…
श्री स्वामी समर्थ व प्रभू श्री राम यांच्याबाबत सातत्याने अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या ज्ञानेश महाराव विरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल...

सोलापूर
संभाजी ब्रिगेड च्या २७ व्या.पार पडलेल्या अधिवेशनात समाज कंटक ज्ञानेश महाराव यांनी श्री स्वामी समर्थां बाबत अवमान कारक वक्तव्य करून समाजात शांतता सुव्यवस्थितेत बाधा
आणण्याचे कारस्थान केले आहे .या अवमान कारक वक्तव्यामुळे भक्त गणांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येतोय.
दरम्यान या घटनेबाबत हिंदू महासभेच्या वतीने ज्ञानेश महाराव विरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात हिंदू महासभेचे शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी तक्रार दाखल केली आहे.
हिंदू धर्मातील प्रभू श्रीराम व श्री स्वामी समर्थ तसेच वारकरी संप्रदाया बद्दल सातत्याने महाराव सारख्या समाज कंटका कडून अपशब्द वापरले जातात अश्या समाज कंटकांना वेळेतच ठेचून काढणे अत्यंत गरजेचे आहे अश्या आशयाचे निवेदन फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माने यांना हिंदू महासभेच्या वतीने देण्यात आले .
हे निवेदन देतेवेळी अखिल भारत हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे,शहर संघटक प्रसाद शेंडगे विनायक पाटील , शुभम कराळे,
श्री चव्हाण,गब्बर चव्हाण सुरज खैरे आदींची उपस्थिती होती…