मनसे कडून महादेव कोगनुरे यांना दक्षिण सोलापूर साठी तर शहर उत्तर मधून परशुराम इंगळे यांना उमेदवारी जाहीर …
समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण...
सोलापूर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील विविध जागांसाठी मनसे च्या एकूण ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली.यामध्ये पहिल्याच यादीत महादेव कोगनुरे यांना दक्षिण साठी तर शहर उत्तर मधून परशुराम इंगळे यांना उमेदवारी देण्यात आली. काँग्रेस मधून महादेव कोगनुरे यांनी राज ठाकरे यांची भेट नुकतीच भेट घेतली होती.आणि महादेव कोगनुरे यांच्या कार्य कर्तुत्वावर विकास पर्वाची पोचपावती म्हणून पहिल्याच यादीत महादेव कोगनुरे यांना प्रमुख्याने राज ठाकरे यांनी संधी दिली.
नक्कीच या संधीचे सोने करू. शहर – जिल्ह्यात मनसे ची ताकद नक्कीच वाढवू .अशी प्रतिक्रिया महादेव कोगनुरे व परशुराम इंगळे यांनी माध्यमांना दिली.
“एकच फाईट वातावरण टाईट”
अशी सद्य स्थिती असताना महाराष्ट्र नव निर्माण सेनेकडून महादेव कोगनुरे तर भाजपचा बालेकिल्ला असलेल्या शहर उत्तर मध्ये परशुराम इंगळे यांना उमेदवारी देण्यात आल्याने चर्चेला उधाण आलंय. दक्षिण सोलापूर मधून धर्मराज काडादी. शरद पवार गटाकडून , विद्यमान आमदार सुभाष देशमुख भाजपा कडून ,माजी आमदार दिलीप माने इच्छुक { प्रतीक्षेत } , आणि आता महाराष्ट्र नव निर्माण सेनेकडून महादेव कोगनुरे यांना उमेदवारी देण्यात आल्याने या मतदार संघात जोरदार फाईट पाहायला मिळणार आहे.
अलीकडे जर महादेव कोगनुरे यांचा जन संपर्क पाहिला तर दक्षिण सोलापूर मध्ये महादेव कोगनुरे आपल्या लोक हितार्थ कामामुळे विशेष लोकप्रिय झाले आहेत . त्यामुळे ही निवडणूक नक्कीच रंगतदार असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.महादेव कोगनुरे व परशुराम इंगळे यांना मनसे कडून उमेदवारी जाहीर झाल्याने समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही मतदार संघावर विजयाचा दावा मनसे चे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे .
उमेदवारी जाहीर झाल्या नंतर युवा नेते अमित राज ठाकरे व बाळा नांदगावकर यांची महादेव कोगनुरे यांनी भेट घेतली.यावेळी बाळा नांदगावकर यांनी “महादेव” कामाला लागा विजयी भव असे आशीर्वाद देत पुढील वाटचालीस महादेव कोगनुरे यांना
शुभेच्छा दिल्या….