अजितदादांकडून पहिल्याच टप्प्यात मोहोळ मधून यशवंत तात्या माने यांना तर इंदापूर मधून दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी जाहीर…

सोलापूर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पहिलीच यादी राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांनी जाहीर केली .राज्यातील विविध ठिकाणी एकूण ३८ उमेदवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार हे बारामती मधून तर आदिती ताई तटकरे श्रीवर्धन येथून निवडणूक लढवणार आहेत.इंदापूर येथून दत्तात्रय भरणे यांना तर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मधून यशवंत तात्या माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकीत “काटे टक्कर “ असा सामना पहायला मिळणार आहे.अजित दादांनी राज्याचा केलेला विकास .मुख्यमंत्री ” लाडकी बहीण” वयोश्री ,अन्नपूर्णा , यासारख्या योजनेच्या माध्यमातून अजित दादांना मिळालेला उदंड प्रतिसाद.
महिला सशक्तीकरण साठी अजित दादांनी घेतलेला पुढाकार . राज्यात अजित दादांना विकास पर्वाच्या अजेंड्यावर मिळालेली लोकप्रियता . महायुतीच्या सरकारच्या काळात शेतकऱ्याच्या वीज बिल माफी चा मोठा निर्णय घेतला गेल्याने शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यात महायुतीला यश मिळाले. विविध विकास कामांसाठी स्थानिक पातळीवर कोट्यावधींचा निधी देऊन राज्याचा साधलेला विकास.यामुळेच पुन्हा एकदा राज्यात महायुतीची सत्ता प्रस्थापित होणार आहे.विरोधकांना येणाऱ्या निवडणुकीत जोरदार फटका बसणार हे मात्र निश्चित….