मनोज जरांगे – पाटील यांनी निवडणुकीचे फुंकले रणशिंग सोलापूर जिल्ह्यातील ११ मतदार संघाच्या सर्व जागा लढणार :- माऊली पवार { सकल मराठा समन्वयक}
सोलापूर
अखेर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले . आणि त्याच पार्श्वभूमीवर सोलापूरात मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांचा मेळावा राजर्षी शाहू महाराज सभागृह, छ. शिवाजी प्रशाला,प्रभात थिएटर समोर सोलापूर येथे शनिवारी दिनांक १९/१०/२४ रोजी सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आला आहे. मराठा समाजाकडून अनेक नवोदित चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याने अनेकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे.
जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी आपला कार्य अहवाल, बायोडाटा, समाजकार्य , सर्वसामान्य वंचित घटकाविषयी केलेले कार्य, आरक्षण आंदोलनातील योगदान, राजकीय,सामाजिक, कौटुंबिक पार्श्वभूमी आदींची माहिती घेऊन सोलापुरात मेळाव्यासाठी यावे असे आवाहन सकल मराठा समन्वयक माऊली पवार यांनी केले आहे .
अकरा विधानसभा मतदारसंघातील सर्वधर्मीय, सर्वजातीच्या उमेदवारांसाठी मेळावा आयोजित करण्यात आल्याचे माऊली पवार यांनी सांगितले.
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे- पाटील निवडणुकीच्या अनुषंगाने राजकारणात सक्रिय होत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलय….