दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक व मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेतील ऑपरेटर चा गलथान कारभार…

सोलापूर
सध्या महाराष्ट्रभरात शिंदे सरकारने लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० रुपये खात्यावर देण्याचे जाहीर केले आहे,ह्याच योजनेच्या लागणाऱ्या कागदपत्र पैकी महत्वाचे मानले जाणारे रेशन कार्ड अद्यावत करण्याच्या अनुषंगाने महिलानी संबंधित पुरवठा कार्यलयात आपल्या रेशन कार्डात नाव कमी जास्त करण्यासाठी गेल्या दोन चार महिन्यापासून साकडं घालण्याच काम चालू केलं आहे, लग्न होऊन गेलेल्या मुलीचे व सून म्हणून कुटूंबात दाखल झालेल्या महिलांनी नाव कमी जास्त करण्यासाठी पुरवठा कार्यलयाचे चकरा मारत असल्याचे चित्र महाराष्ट्र भर दिसत आहे. आणि हयाच धर्तीवर दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय अंतर्गत असलेल्या पुरवठा शाखेत मात्र पुरवठा निरीक्षकांनी नागरिकांची चांगलीच हेळसांड केल्याच चित्र दिसून येत आहे. त्यात लाडकी बहीण योजनेचा भर औरच.काही वर्षांपूर्वीच महसूल व पुरवठा शाखा स्वतंत्र झाल्याने आकृतीबंध नियमानुसार महसूल कर्मचारीना संबंधित महसूल कार्यालयात वर्ग करण्याचे सत्र जोरात चालू होते. मागील महिन्यात देखील बदली सत्रामध्ये अनेक नवीन पुरवठा भागाचे नवनियुक्त पुरवठा निरीक्षक व निरीक्षण अधिकारी ह्यांची नियुक्ती होऊन पदभार घेतले असताना, महसूल भागातील लिपिक हे दक्षिण तहसील कार्यालयात अजूनही पुरवठा निरीक्षक पदावर कोणाच्या वरदहस्ताने पुरवठा भागात तळ ठोकून आहेत हे अद्याप कळले नाही.पुरवठा कार्यालयात मनुष्य बळ कमी असल्याचे सांगून नागरिकांना फेऱ्या माराव्या लागतात तर दुसरीकडे लाडक्या बहिण योजनेचे फार्म भरण्याचे अंतिम तारीख जवळ आल्याने काम होत नसल्याने अनेक नागरिक दक्षिण सोलापूर तहसील कार्यलय पुरवठा विभागावर नाराजगी व्यक्त होताना दिसत आहे.मागील काहीच दिवसापूर्वी मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत बेरोजगारांना शासकीय कार्यलयात तातपुरत्या स्वरूपात निमशासकीय कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तर ह्याच पदाचा गैरफायदा घेत दक्षिण सोलापूर पुरवठा कार्यलयातील एका निमशासकीय कर्मचारीने नावाप्रमांणे पैशाचा सौदा झाल्याशिवाय कामाला हात लावत नसल्याचे दिसून आले आहे.परिणामी अनेक महिला लाडक्या बहीण योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.दक्षिण तहसील कार्यलयातील पुरवठा विभागात शिधापत्रिका धारकांची बरेच प्रकरणे प्रलबित आहेत.शिंदे सरकारने गौरी गणपती निमित्त जाहीर केलेल्या आनंदाचा शिधा सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील रेशन दुकानात सर्वात आधी येऊन सुद्धा ढिसाळ नियोजनमुळे अद्यापपर्यत अनेक लाभार्थी वंचीत आहेत,केंद्र सरकारने नोव्हेंबर अखेर पर्यत ekyc बाबत मुदत दिली असताना दक्षिण सोलापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात ekyc झालेच नसल्याचे चित्र दिसत आहेत. स्वतःहून पुरवठा विभागात गेलेल्या नागरिकांना देखील निराशाजनक वागणूक मिळत आहेत. संबंधिताकडे विचारणा केली असता, वरिष्ठाने दुसरीकडे काम लावल्याचे कारण पुढं केली जातात.
आता या अश्या जिल्हाधिकारी परिसरातील मध्यवर्ती व दुर्लक्षित कार्यालयातील सर्व तक्रारीकडे जिल्हाधिकारी साहेब न्याय व लक्ष देतील का याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागुन आहे.