शहर उत्तर च्या समीकरणात ॲड.मिलिंद थोबडे यांच्या नावाची चर्चा ….
शहर उत्तर मधून जनसेवेची संधी मिळाल्यास संधीचे सोने करू:- ॲड.मिलिंद थोबडे { इच्छूक उमेदवार}

सोलापूर
शहर उत्तर चे समीकरण बदलत असताना प्रामुख्याने पाहायला मिळत आहे .तसा शहर उत्तर भाजपचाच बालेकिल्ला .माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांचा शहर उत्तर वर विशेष प्रभाव. लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान आमदार राम सातपुते ना शहर उत्तर मधून सर्वाधिक मतदान. आमदार विजयकुमार देशमुख यांची शहर उत्तर मध्ये *” मालक “* या नावाने विशेष ओळख आहेच. हेच *“मालक”* शहर उत्तर मतदार संघातील नागरिकाच्या सुख: दुःखात नेहमी सहभागी असतात. शहर उत्तर चा सर्वांगीण विकास याच मालकांनी केला आहे . आताचे समीकरण मात्र वेगळ्या सवरुपत बदलताना दिसत आहे .अनेक जण याच मतदार संघातून आपले नशीब आजमावण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावतायत.
मात्र विधिज्ञ क्षेत्रातील संपूर्ण सोलापूर सह राज्यात आपल्या कार्य कर्तुत्वाने परिचय असणारे नाव *“ॲड.मिलिंद थोबडे”*. ॲड मिलिंद थोबडे यांनी महाराष्ट्र राज्य बार असोसिएशन चे राज्याध्यक्ष भूषविले आहे . ॲड.मिलिंद थोबडे हे शहर उत्तर विधानसभा मतदार संघातून इच्छूक उमेदवार आहेत.ॲड.मिलिंद थोबडे यांच्या रूपात शहर उत्तर साठी हा आश्वासक चेहरा मानला जात आहे.
सोलापूर जिल्हा न्यायालयात, उच्च न्यायालयात त्यांच्या निकालांचीच नेहमी चर्चा असते . ॲड.मिलिंद थोबडे राजकारणात सक्रिय होत असल्याने हा सद्यस्थितीत चर्चे चा विषय ठरत आहे . भाजप मधून उमेदवारी मिळण्यासाठी सर्वोतोपरी जोरदार हालचालींना वेग आला आहे.उमेदवारी मिळवण्यात आमदार विजयकुमार देशमुख व ॲड.मिलिंद थोबडे यांच्या *“काटे की टक्कर”* पाहायला मिळणार आहे हे निश्चित.
ॲड. मिलिंद थोबडे राजकारणात सक्रिय होत असल्याने नवोदित वकील ,
पक्ष कार, आणि संपूर्ण सोलापूर शहर – जिल्ह्यात त्यांच्याच नावाची चर्चा पाहायला मिळत आहे. आपल्याला भाजप मधून संधी मिळाल्यास शहर उत्तरचा नक्कीच कायापालट करू . बेरोजगारांचा प्रश्न मार्गी लावू . शहर उत्तर मधील प्रलंबित प्रश्न मार्गी लावू .मतदारांनी आपल्याला *“जनसेवेची”*
संधी दिल्यास मिळालेल्या संधीचे लोक हितार्थ कार्यासाठी नक्कीच सोने करू अस आश्वासन ॲड.मिलिंद थोबडे यांनी दिले आहे …