crimemaharashtrapoliticalsocialsolapur
विजेचा धक्का बसून मृत्यू झालेल्या कै .अनिल कलसुरे यांच्या कुटुंबियांना महादेव कोगनुरे यांनी दिला धीर…

सोलापूर
हत्तुर ( ता.दक्षिण सोलापूर ) येथे दि 8 ऑक्टोबर 2024 रोजी शेतातील मोटार चालू करताना विजेचा धक्का बसून कै अनिल महादेव कलसुरे यांचा मृत्यू झाला होता.कै अनिल कलसुरे यांना तीन वर्षाचे दोन जुळी मुली आहेत.तरुण वयातच अनिल कलसुरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण हत्तुर गावावर शोककळा पसरली होती.घरातून कर्ता पुरुष निघून गेल्याने कलसुरे कुटुंबियावर दु:खा चा डोंगर कोसळला होता.म्हणून आज एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी हत्तुर येथील कलसुरे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन कुटुंबियांना धीर दिला.यावेळी एम के फाउंडेशन चे पदाधिकारी उपस्थित होते.